ठळक मुद्दे१ डिसेंबरपर्यंत घेतील आढावाटोकीयोतील गटारींच्या धर्तीवर केले जाणार मार्गदर्शन
आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२८ - केंद्र शासनाच्या अमृत योजनेतंर्गत शहरात पाणीपुरवठा योजना, भुयारी गटारी व मलनिस्सारण योजनांना मंजुरी मिळाली आहे. या कामांना लवकरच मनपाकडून सुरुवात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या कामांसाठीच्या मार्गदर्शनासाठी शहरात जपानच्या चार सदस्यांचे पथक सोमवारी दाखल झाले. या पथकाकडून वाघूर धरण व उमाळा येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. मंगळवारीही या पथकाने काही ठिकाणांना भेटी दिल्या. जपान येथील ‘द जपान कौन्सिल आॅफ लोकल आॅथोरिटीज फॉर इंटरनॅशनल रिलेशन’ (क्लिअर) असे संस्थेचे नाव आहे. या पथकाकडून शहरातील विविध भागांमध्ये पाहणी करून अमृत योजनेतून होणाºया कामांबाबत मनपा प्रशासनाला काही तांत्रिक बाबतीत मार्गदर्शन केले जाणार आहे. उमाळा येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाची पाहणी पथकाने केली. यावेळी शहर अभियंता बी.डी.दाभाडे व प्रकल्प अभियंता योगेश बोरोले हे उपस्थित होते. १ डिसेंबरपर्यंत घेतील आढावाचार सदस्यांचे हे पथक शहरात १ डिसेंबरपर्यंत थांबणार असून शहरातील विविध भागात जावून पाणी पुरवठा योजना व भूमिगत गटारींच्या कामांची प्रभावी अंमलबजावणीबाबत आढावा घेतील. तसेच या पाहणीदरम्यान कोणत्या ठिकाणी भूमिगत गटार तयार करणे योग्य ठरेल याबाबतचे सर्व्हेक्षण देखील पथकाकडून करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा योजनांचा देखील अभ्यास देखील या पथकाकडून करण्यात येणार आहे. अमृत योजनेतंर्गत मलनिस्सारण व भूमिगत गटारींच्या कामांसाठी १३१ कोटी ५६ लाख तर पाणी पुरवठा योजनेसाठी १९१ कोटी ८६ लाख रुपयांची कामे होणार आहेत. टोकीयोतील गटारींच्या धर्तीवर केले जाणार मार्गदर्शनजपान येथील टोकीयो या शहरातील हे पथक असून, जगातील सर्वोत्तम भुयारी गटारींची सुविधा ही या शहराची मानली जाते. शहरात कितीही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास शहरात कोणत्याही ठिकाणी पावसाचे पाणी तुंबत नाही. त्यामुळे जगातील बºयाचशा शहरांमध्ये नव्याने भुयारी गटारींचे काम केले जात असताना, टोकीयो येथील ‘ड्रेनेज सिस्टीम’चा अभ्यास केला जातो. जपानहून आलेल्या पथकाकडून देखील मनपाच्या अभियंत्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. भूमिगत गटारींच्या मार्गदर्शनासाठी जपानचे पथक जळगावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 1:06 PM