जळगाव : शहरातील विसनजीनगर येथील जय गोविंदा मित्र मंडळातर्फे अभिनव विद्यालय व इतर विद्यालयातील सुमारे १ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून तसेच मास्कचा वापर करून विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, खोडरबर आदी साहित्य मान्यवरांच्याहस्ते देण्यात आले़ विशेष म्हणजे, कोरोनामुळे कार्यक्रमाला उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्याना शाळेत शालेय साहित्य वाटप केले जाणार असे, मंडळाचे प्रमुख शाम कोगटा यांनी सांगितले आहे.शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमावेळी शोम कोगटा, मनोज चौधरी, रोहित कोगटा, निवास व्यास, गणेश गायकवाड, कैलास चौधरी, रमेश माळी, पवन ठाकूर, कुणाल बडगुजर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्ते उपस्थित होते. उपक्रमासाठी अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत पाटील, प्रेमसिंग चव्हाण, सजन तडवी, पंकज पाटील यांचे सहकार्य लाभले तर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईच्छापूर्ती गणेश मंदिराचे कर्मचारी सुनील बारपांडे, प्रमोद जोशी, रवींद्र नांदे, भूषण पाटील आदींनी परिश्रम घेतले.
जय गोविंदा मित्र मंडळातर्फे १ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 7:22 PM