‘खोटे’ हा शब्द व्याकरणात भलेही गुणविशेषण असेल, पण व्यवहारात मात्र ते दुगरुणी दुषण आहे. ज्यांचे ‘मोठे’ होण्याबाबत कुपोषण झालेले असते त्यांना ह्याचा संसर्ग पटकन् होऊन, एकाच्या आजाराचे रूपांतर सामाजिक साथीच्या रोगात व्हायला वेळ लागत नाही. कसे कोण जाणे पण नानाला ह्या ‘मोठे’ व्हायच्या आजाराने पछाडले. आपण छोटे न राहाण्याचा चंग बांधला. मोठे, नाववाले, सुप्रसिद्ध व्यक्ती होण्यासाठी त्याने प्रय}ांची पराकाष्ठा केली. अंगात मोठेपणा नसताना मोठे म्हणून मिरवता येण्यासाठी जे जे करता येतील ते ते सर्व प्रय}, तन मन धन (विशेषतअ धन) खर्ची घालून केले. गावगन्ना छोटय़ा गल्ली पुढा:यांच्या फोटोगर्दीत स्वतअचा मोठा चेहरा छापवून, तसे सप्तरंगी ‘डिजिटल बॅनर्स’ नाक्या-नाक्यावर लावले. गांधी, आंबेडकर, इत्यादी थोर पुरुषांच्या जयंत्या मयंत्यांचे मुहूर्त साधून, त्यांच्या छायाचित्रांशेजारी आपली हसरी छबी छापून, आदरांजली वाहिल्या. सरपंचापासून तर संरक्षण मंत्र्यांर्पयतच्या मंडळींच्या जन्मतारखा शोधून चौकाचौकात फलक लावून त्यांचे, आपल्या पुप्षगुच्छात लपेटलेल्या छबीसह अभिनंदन केले. ह्या धडपडीचे फलीत एवढेच झाले की ते डिजिटल बॅनर्स, उन्हा-पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून अनेक झोपडय़ांच्या छतांवर अंथरलेले दिसू लागले आणि तरीही त्यांनी नाना प्रत्यक्ष समोर येऊन उभा असताना, ‘आपण ज्याला आपल्या झोपडीच्या छतावर पालथा घातलाय, तो हाच’ म्हणून ओळखले नाही. माङया अपेक्षेप्रमाणे नाना एक दिवस माङयासमोर येऊन उभा राहीला. मी त्याचे स्वागत करत म्हणालो, ‘कसे आहात नाना साहेब? आपण मोठी माणसं. आपल्यासारख्यांचे पाय आमच्या घराला लागले हे आमचे अहो भाग्य!’ यावर नाना चिडून म्हणाला, ‘असंच, असंच लोकांनी म्हणाव,ं अशी माझी अपेक्षा आहे. पण नाही म्हणत ना! अरे मोठे होण्यासाठी काय नाही केलं मी? पण हरामखोर खाण्या-पिण्यापुरते, पाटर्य़ा झोडण्यापुरते मला मोठेपण देतात. मी जराशी बरी बातमी दिली की लगेच ‘अरे क्या नानाशेठ, ऐसी बाते ऐसे बतायी जात है क्या, इसपर तो पार्टी बनती है. सिलेब्रेट होने को मंगताय.’ माङया ह्या मोठेपणाच्या प्रय}ात सत्तावीस कोंबडय़ा आणि दोन बोकडांनी बलीदान केलंय माहीत आहे? पण नंतर काय? मी नानाचा नानाच राहिलो.’ मी वैतागून विचारलं, ‘पण नाना, तुला मोठेपणा मिळवण्यासाठी असा खोटेपणा करायची गरज काय? तू संगीत ¨बंगीत क्षेत्रात मोठं नाव कमवण्यासाठी मुंबईला गेला होतास ना? त्याचं काय झालं?’ ह्यावर आमचा नान्या, तत्वज्ञान्यासारखा चेहरा करून म्हणाला, ‘कर्तृत्व नसताना मोठेपणा हवा असेल तर अंगी खोटेपण असायलाच हवा. पण अनुभवांती सांगतो, ‘जया अंगी खोटेपण, त्या यातना कठीण’ तू म्हणतो तसा मी नर्तक, गायक होऊन नाव कमवायचा प्रय} केला. अनेक स्पर्धामधे भाग घेतला. गाणी रचली, संगीतही दिलं. चाली रचल्या, स्वखर्चाने अल्बमही काढला. परिणाम म्हणून दोन चार ठिकाणी परीक्षक म्हणूनही जाऊन आलो. माझा अनुभव ऐकायचाय? ऐक - आताच गाढवांची गाणी शिकून आलो, आताच मी यशाचे जोडे पुसून आलो. मी पाफलून जातो वरच्या सूरात जाता, टाळ्या, शिटय़ांमधेही मी कोकलून आलो. माङया बिलंदरची ते सांगती कहाणी, ‘स्पर्धा ’ बघून गेलो, ‘तारा’ बनून आलो. चोरू कशी पुराणी, करण्या नवीन गाणी, सारी अवीट गीते मी बाटवून आलो. हे गीतही न माङो, टोहोच हा सुरांचा, तासाभरात सा:या चाली रचून आलो. सजुनी सदा करावा शृंगार गायनाचा, आताच बेसुरांना मोठे करून आलो. दिसला जरी कुणाला गोंगाट गायकांचा, माझी तशीच गीते मी गाजवून आलो. (पूर्वार्ध)
‘जया अंगी खोटेपण.. परी व्यवहार होई..’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 4:16 PM