मोहन सारस्वतजामनेर : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कार्यालय अधीक्षक जे.बी.चौधरी गेल्या १७ वर्षांपासून योग प्रसार व प्रचाराचे कार्य करीत आहे. त्यांनी २००२ मध्ये धुळे येथलन योग शिक्षक पदवी प्राप्त केली. ते शहरात नियमित योग वर्गाचे संचलन करतात. नागरिकांमध्ये योगाबद्दल जागृती व्हावी यासाठी एखाद्या संस्थेने बोलाविल्यास ते आवर्जुन जातात व योगाचे प्रशिक्षण देतात. महाविद्यालयात होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनाही ते योगाचे प्रशिक्षण देतात. योगामुळे अर्धशिशी, निद्रानाश, अशक्ततणा, कंबरदुखी, अॅसिडिटी, सर्दी आदी व्याधींपासून आराम मिळतो. नियमितपणे योगासन, प्राणायम व ध्यान केल्याने दिवसभर स्फूर्ती मिळते. योग हा आपल्या देशाचा सांस्कृतिक ठेवा असून त्याचा प्रसार व्हावा यासाठी कार्यरत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
योगाचा सांस्कृतिक ठेवा जोपासणारे जे.बी.चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 2:50 PM