वऱ्हाड घेऊन जाणारी जीप उलटली, १३ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 8:12 PM
हिंगोणे गावाजवळील दुर्घटना
फैजपूर, ता. यावल : अडावद ता चोपडा येथून लग्नकार्य आटपून बऱ्हाणपूरकडे (मध्यप्रदेश)परतीच्या प्रवासाला जाणारी वऱ्हाडाची प्रवासी जीप हिगोणेजवळ पलटी झाल्याने १२ ते १५ जण जखमी झाले. यात महिला व लहान मुले गंभीर जखमी झाले. जखमींवर तातडीने फैजपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून त्यांना जळगाव येथे पुढील उपचारार्थ रवाना करण्यात आले. हा अपघात शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान झाला. या अपघाताने जानेवारी मध्ये झालेल्या व त्यात बारा जण दगावलेल्या घटनेची आठवण करून दिली.वृत्त असे की, अडावद येथून लग्नकार्य आटोपून (एमपी ०९-बीसी ३६०८) ही जीप बऱ्हाणपूर येथे वऱ्हाड घेऊन जात असताना हिंगोणा गावाजवळील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने या गाडीने तीन ने तीन ते चार पलट्या घेतल्या या अपघातात वाहनातील १२ ते १५ जण जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढून त्यांना फैजपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व त्यातील काही महिला रुग्ण व बालकांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे उपचारासाठी रवाना केले.येथील नगरसेवक शेख कुर्बान शेख करीम, कलीम मन्यार, माजी नगरसेवक मेहबूब पिंजारी, अब्दुल जलील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक यांच्यासह अनेकांनी रुग्णांना जळगाव येथे उपचारासाठी वाहने उपलब्ध करून दिली.दरम्यान घटना घडल्यानंतर चालक फरार झाला तर घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेत हेड कॉन्स्टेबल देविदास सूरदास, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील, बाळू भोई यांनी लगेच वाहतूक सुरळीत केली.रिक्षा चालकाचे कार्य कौतुकास्पदहिंगोणा येथील रिक्षाचालक किरण बाबुराव तायडे याने अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आपल्या रिक्षातील प्रवाशांना उतरून त्याने जखमी महिलांना तातडीने फैजपूर येथे उपचारासाठी आणल. त्यामुळे जखमींना त्वरित उपचार मिळाले. या रिक्षाचालकाचे सर्वांनी कौतुक केले.जखमींची नावे ...साकीयाबी शेख रफीक (४५), नजमाबी शेख शफीक (५०), आशिका इमरान पटेल (२०), आलिया आशिक पिंजारी (१०), शमीम शेख असलम (३०), नजमा शेख इस्माईल पिंजारी (५०), रेहान शेख रहीम (६), फातिमाबी मुनीर खा (५०), सईदा सत्तार मंसूरी (५०), इशरतबी शेख रहीम पिंजारी (२५) ,नसीम शेख गफूर (५०), यास्मिन जाकीर पिंजारी (५०), अनस जाकीर पिंजारी (१२)