अमळनेर : तालुक्यातील धावडे येथे एका १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी दुसऱ्या आरोपीलाही अटक केली आहे. आरोपीला २ दिवसाची कोठडी सुनावली आहेधावडे येथे फेब्रुवारी महिन्याच्या ५ ते सहा महिन्यांपूर्वी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी खाटेवर झोपली असताना गोकुळ एकनाथ पाटील याने तिच्यावर अतिप्रसंग केला. ती बालिका ४ महिन्याची गर्भवती राहिली होती. याप्रकरणी अमळनेर पोलिसात गोकुळ एकनाथ पाटील विरुद्ध बलात्कार व पोस्को कायद्यनुसार गुन्हा दाखल केला. आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या घटनेत पीडित मुलीने जळगाव येथे महिला बालकल्याण समिती समोर जबाब दिला होता. त्यात अमोल पाटील याने देखील अत्याचार केल्याचे म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी अमोल पाटील (वय २५) याला २८ रोजी रात्री अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्या. राजीव पांडे यांनी १ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पहिला आरोपी गोकुळ पाटील जिल्हा कारागृहात आहे.दोघांच्या आत्महत्याअमळनेर : तालुक्यात पळासदळे व कस्तुरा बाग या दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी आत्महत्या केल्याची घटना २९ रोजी घडली कस्तुरा बाग मुंदडा नगर जवळ छोटू हिलाल पाटील (४०) यांनी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पळासदळे येथे प्रकाश दयाराम पाटील (५५) यांचा सायकाळी साडे सात वाजता विहिरीत पडून मृत्यू झाला.
मुलीवर बलात्कार करणारा आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 5:58 PM