कुºहाड, ता.पाचोरा : येथून जवळ असलेल्या म्हसास गाव शिवारात ८ रोजी सायंकाळी येथील एकाच घरातील जेठाणी व दिराणीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. विहिरीत तरंगलेल्या चपलांवरून घटनेचा तपास लागला. कविता संजय पाटील (३२) व चंद्रकला गजानन पाटील (२७) असे मयत महिलांचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर गावातील एकाने विषप्राशन केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही घटनांचा परस्परांशी काही संबध आहे का? या दृष्टीने पोलीस चौकशी करीत आहेत.या घटनेनंतर याच गावातील दोन जणांनी बुधवारी दुपारी विषप्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना पाचोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन्ही घटनांचा काही परस्पर संबध आहे का? या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
जेठाणी व दिराणीचा विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 9:10 PM