ठळक मुद्देसंस्थेची शतकी वाटचाल सुरूवार्षिक अहवाल व हिशोब पत्रकांना मंजुरी
लोकमत आॅनलाईनजळगाव, दि.१७- तीन संचालकांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि.१७ रोजी दुपारी नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेली जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेची १००वी वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत पार पडली. त्यात गुणवंत सभासद पाल्य तसेच यश प्राप्त केलेल्या सभासदांचा सत्कारही करण्यात आला. जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव या संस्थेची १०० वी वार्षिक साधारण सभा संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र भास्करराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर संचालक डॉ.साठे, दीपक सूर्यवंशी, डॉ.सतीश देवकर, अॅड.पी.डी.पाटील, अॅड.भरत पाटील, किरण साळुंखे, अॅड.ललिता पाटील, नरेंद्र पाटील, पुष्पा पाटील, सोनल पवार, मनोहर पाटील, अॅड.भरत देशमुख, अण्णासाहेब कापसे, अॅड. विजय भास्करराव पाटील, हरिभाऊ पाटील,प्रशांत पवार, काळे आदी संचालक तसेच मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. संस्थेची शतकी वाटचाल सुरू असून संस्थेच्या या वाटचालीत सर्व सभासद, संचालकांचा मोठा हातभार असल्याचे सांगितले. यावेळी अजेंड्यावरील मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे, वैधानिक लेखापरिक्षकांनी दिलेला २०१६-१७ चा लेखापरिक्षण अहवालाचा आढावा घेऊन नोंद घेणे, संस्था व संस्थेने चालविलेल्या शैक्षणिक शाखा व विभागांचा २०१६/१७ च्या वार्षिक कामकाजाचा अहवाल व हिशोब पत्रकांना मंजुरी देण्याबाबत विचार करणे, २०१७-१८ साठी संचालक मंडळाने शिफारस केलेल्य अंदाजपत्रकास मंजुरी देणे, २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या हिशेबाची तपासणी करण्यासाठी लेखापरिक्षकांची नियुक्ती करणे आदी विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी केले. आभार डी.बी. पवार यांनी मानले.शेतकरी परिषदेबाबत आवाहनशेतकºयांच्या विविध संघटनांतर्फे २६ रोजी जळगावात नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात शेतकरी परिषदेचे आयोजन केले आहे. त्यास उपस्थितीचे आवाहन करण्यासाठी परिषदेच्या समन्वयक प्रतिभा शिंदे या परिषदेच्या ठिकाणी आल्या. त्यांनी अध्यक्षांच्या परवानगीने व्यासपीठावर येऊन सभासदांना परिषदेस उपस्थितीचे आवाहन केले. यावेळी अध्यक्षांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कारही करण्यात आला. जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेची १००वी वार्षिक सभा शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 3:53 PM