शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

जिनिंगची धडधड मंदावली..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2017 12:29 AM

नोटाबंदीचा परिणाम : चांगले भाव असून बोदवड येथील कापसाच्या बाजारपेठेवर परिणाम

बोदवड कापसाची बाजारपेठ असलेल्या बोदवड तालुक्यातील 11 जिनिंगची धडधड कापसाअभावी मंदावली आहे. नोटाबंदीचा परिणाम या कापसाच्या बाजारपेठेवर झाला आहे. केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या नोटांवर बंदी घातली. त्यानंतर जिनिंग उद्योजकांनी कापूस खरेदी चार हजार 600 ते चार  हजार 800 रुपयांर्पयत चेक व   टोकनने देण्यास सुरू करीत व्यवहार काही अंशी सुरू केला त्यात काही शेतक:यांनी कापूस विकून चेक ही घेतले, परंतु बँकांसमोर लागलेल्या रांगा तर आठवडय़ाला मिळणारी दोन हजार-चार हजार र्पयतच्या रकमेने  शेतक:यांनी कापसासह शेतमाल विकणे बंद केले आहे. दुसरीकडे बोदवड तालुक्यात जेमतेम चार  राष्ट्रीयकृत बँका आहेत. पूर्ण भार त्यावर पडल्याने रोख रकमेची अडचण सुरू आहे. जिनिंग उद्योजकाचे हात ही बांधल्या गेल्याने हातात घास असून ही जेऊ शकत नसल्याची परिस्थिती शेतकरी व उद्योजकांवर ओढावली आहे. कापसाच्या बाजारपेठेवर नोटबंदीचा परिणाम झाला आहे. या आठवडय़ात राज्य पणन महासंघ व सीसीआयचे केंद्रीय कापूस खरेदी केंद्र सुरू  झाले  आहे. त्यांनी खुल्या लिलाव पद्धतीने कापसाच्या खरेदीला सुरुवात केली आहे. त्यामुळे उद्योजक ही कापसाला वाढीव भाव देण्यास तयार झाला आहे. त्यामुळे केंद्राच्या कापूस खरेदी केंद्रावरील पाच हजार 100 च्या खरेदीला राज्य पणन महासंघाने पाच हजार 400 तर जिनिंग उद्योजकांनी पाच हजार 500 र्पयतच्या भावात कापसाच्या खरेदीला सुरुवात केली आहे. पण नोटाबंदीच्या कारणामुळे  बॅँकांसमोरील  रांगा व मिळणारी पूर्ण सोन्याची किंमत आज मातीमोल झाली आहे. शेतकरी कापूस विकण्यास कचरत आहे. परिणामी जिनिंगची धडधड मंदावली आहे. जागतिक बाजारपेठेत कापसाला मागणी बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशिया, जाकार्ता या देशात कापसाला मोठी मागणी आहे तर चीनने मागणी कमी केली आहे. कापसाच्या  एका गठाणीचा  भाव 40 हजार रुपयांर्पयत आहे.  बांगलादेशसह इंडोनेशियामध्ये भारतीय कापसाला मागणी असल्याची माहिती दिली. गठाणी 40 हजार, सरकी दोन हजार 400 ते 500 व कापूस भावच हजारावर गेला आहे.