ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 27 - पाचोरा येथील जितेंद्र अरुण पाटील हा जळगाव जिल्ह्यातील पहिला रणजी क्रिकेटपटू असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने रणजी स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन सामन्यात प्रतिनिधित्व करण्यासोबतच आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. भुसावळ येथे मध्य रेल्वेच्या सेवेत असलेला हा 28 वर्षीय खेळाडू सध्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर असला तरी आपण आता पुनरागमनाच्या प्रय}ात आहोत असे त्याने लोकमतशी बोलताना सांगितले.28 वर्षीय जितेंद्रपाठोपाठ आता जळगावच्या जगदीश झोपेला रणजी सामन्याची संधी मिळाली आहे.
उजव्या हाताने फलंदाजी व डावखूरा मध्यमगती गोलंदाज असलेल्या जितेंद्रने महाराष्ट्रासाठी 2010-11 च्या दोन रणजी सामन्यात 39 धावा केल्या असून गोलंदाजीत 254 धावात 7 बळी मिळवले आहेत. यात उत्तर प्रदेशविरुध्द तीन आणि दिल्लीविरुध्दच्या चार बळींचा समावेश आहे. दिल्लीविरुध्दचे 113 धावातील चार बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी राहिली आहे.
जितेंद्रला 2010-11 मध्ये प्रत्यक्ष प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले असले तरी 2006-07मध्येही अवघ्या 17 वर्षे वयात त्याची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड झाली होती.
आयपीएलच्या 2009 च्या सत्रात रॉयल च?लेंजर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुध्द त्याला संधी दिली होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा खेळली गेली होती. यानिमित्ताने अनिल कुंबळे, राहुल द्रविड, विराट कोहली, मार्क बौचर, नेथन ब्रेकन, केदार जाधव, जेकस् कॅलिस, ख्रिस गेल अशा नामवंत खेळाडूंसोबत राहण्याची संधी त्याला मिळाली होती.
2009 मध्ये अभिनव मुकुंद व,भुवनेश्वर कुमार यांच्यासोबत त्याची प्रतिष्ठेच्या बोर्डर- गावस्कर शिष्यवृत्तीसाठीसुध्दा निवड झाली होती. मात्र नंतर दुखापतींनी त्याच्या बहरणा:या कारकिर्दीला ब्रेक लावला परंतु आपण आता त्यातून बाहेर आलो असून पुनरागमनाच्या प्रय}ात असल्याचे त्याने सांगितले.