जळगाव : पुणे व शिरपूर येथून चोरी झालेल्या दुचाकींसह खासगी वृत्त वाहिनाचा पत्रकार योगेश मुरलीधर बैरागी (वय २९, रा.पंकज नगर थांबा, चोपडा) व मनोज शालिक सोनवणे (वय ३०, रा.वाल्मीक नगर, चोपडा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. या दोघांकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.चोपडा येथे एका पत्रकाराकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती कॉन्स्टेबल सूरज पाटील यांना मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी एक पथक चोपडा येथे पाठविले होते. योगेश बैरागी याला दुचाकीसह ताब्यात घेतले असता त्याने ही दुचाकी पुणे येथील मित्र वैभव सोनवणे याने दिली असल्याचे सांगितले. दरम्यान, जी दुचाकी बैरागीजवळ होती त्याबाबत पुणे येथील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. दुसरी दुचाकी मनोज सोनवणे याच्याकडून विकत घेतल्याचे त्याने सांगितले. ती दुचाकीही शिरपूर येथून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले व त्याबाबतही गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, दोघांना अटक केल्यानंतर शिरपूर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
चोरीच्या दुचाकीसह चोपड्यात पत्रकाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 2:00 PM
पुणे व शिरपूर येथून चोरी झालेल्या दुचाकींसह खासगी वृत्त वाहिनाचा पत्रकार योगेश मुरलीधर बैरागी (वय २९, रा.पंकज नगर थांबा, चोपडा) व मनोज शालिक सोनवणे (वय ३०, रा.वाल्मीक नगर, चोपडा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. या दोघांकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.
ठळक मुद्देस्थानिक गुन्हा शाखेची कारवाईशिरपूर पोलिसांकडे सोपविलेचोरीच्या दोन दुचाकी केल्या हस्तगत