चाळीसगाव, जि.जळगाव : चिरमुड्यांचे लोभस आणि निरागस चेहारे... हसतमुखाने आपल्या स्टॉलवर आलेल्या ग्राहकांचे स्वागत करताना भावूक करणारे अदरातिथ्य पाहून मोठ्यांनाही क्षणभर काही तरी घेण्याचा मोह होत होता... आल्हाददायक गारवा आणि बालिका दिनाचे औचित्य साधत व्ही.एच.पटेल प्राथमिक विद्यालयात आयोजित आनंद मेळाव्यात मौजेची लयलूट करताना विद्यार्थ्यांनी 'खरी कमाई' करण्याचा अनुभवदेखील गाठीशी बांधला. संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालकांसाठी ही खाद्ययात्रा यादगार ठरली.बालिका दिनाचे औचित्य साधताना शुक्रवारी जल्लोषात आनंद मेळावा साजरा झाला. सकाळी साडे नऊ वाजता मेळाव्याचे उद्घाटन संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर, शाळा समितीचे चेअरमन राजेंद्र चौधरी, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सुरेश स्वार, अॅड.प्रदीप अहिरराव, मु.रा.अमृतकार, क.मा.राजपूत, डॉ.सुनील राजपूत, मुख्याध्यापक के.एन.तडवी, शहा, विजया सोमवंशी, भाऊसाहेब जगताप आदी उपस्थित होते. स्वागत राजेंद्र चौधरी यांनी केले. एकूण ५० वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही लावले होते. वस्तू विक्री व खरेदीचाही अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. मेळावा यशस्वी करण्यासाठी स्काऊटच्या कब बुलबुल युनिटसह शिक्षकांनी सहकार्य केले.वेशभूषा ठरली लक्षवेधीबालिका दिनानिमित्त इंदिरा गांधी, झाशीची राणी, राजमाता जिजाऊ, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, कल्पना चावला, मदर तेरेसा, लता मंगेशकर, प्रतिभाताई पाटील यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनींनी उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याच विद्यार्थिनींनी मान्यवरांचे सस्नेह स्वागतही केले.
चाळीसगावला पटेल प्राथमिक विद्यालयात आनंद मेळाव्याची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 3:46 PM
चिरमुड्यांचे लोभस आणि निरागस चेहारे... हसतमुखाने आपल्या स्टॉलवर आलेल्या ग्राहकांचे स्वागत करताना भावूक करणारे अदरातिथ्य पाहून मोठ्यांनाही क्षणभर काही तरी घेण्याचा मोह होत होता... आल्हाददायक गारवा आणि बालिका दिनाचे औचित्य साधत व्ही.एच.पटेल प्राथमिक विद्यालयात आयोजित आनंद मेळाव्यात मौजेची लयलूट करताना विद्यार्थ्यांनी 'खरी कमाई' करण्याचा अनुभवदेखील गाठीशी बांधला. संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालकांसाठी ही खाद्ययात्रा यादगार ठरली.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी लुटला 'खरी कमाईचा आनंदविद्यार्थ्यांनी लावले ५० स्टॉल विद्यार्थ्यांनी घेतला खरी कमाईचा अनुभवबालिकांची वेषभूषा ठरली आकर्षकसंस्था पदाधिकारी व पालकांनी लुटला आनंद