जळगाव : गेल्या चार महिन्यांपासून जो काही कोरोनाचा संसर्ग व त्यामुळे होणारे परिणाम होते़ त्यापेक्षा तीन पटीने जुलै महिन्यात विविध पातळ्यांवर कोरोनाचा संसर्ग वाढला़ यात उपायोजनांमध्ये प्रशासनाकडून वाढ झाली़ यात बरे होणाऱ्यांचे प्रमाण आता सर्वाधिक असल्याने ही बाब निश्चितच जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे़ बाधितांमध्ये तब्बल तीन महिन्यात तिपटीने वाढ होऊन संख्यने दहा हजारांचा टप्पाही ओलांडला़मार्च ते जून पर्यंतची परिस्थिती बघता जिल्हाभरात शक्यतोवर सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात रुग्ण आढळून यायला सुरूवात झाली होती़ त्यात जळगाव, अमळनेर, भुसावळ हे हॉटस्पॉट होते़ मात्र, मध्यंतरी यांनाही मागे टाकत काही तालुक्यांमध्ये कमालीचा संसर्ग वाढला व चिंतेचे ढग अधिक गडद झाले. जुलैत मात्र, या संसर्गाने कहरच केला व एकट्या जुलैत तब्बल ७५२१ नवे रुग्ण समोर आले़ अर्थात चाचण्यांचे प्रमाणही त्याच प्रमाणही वाढविण्यात आले होते़
जुलै ठरला सर्वाधिक कोरोना संसर्ग वाढीचा महिना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 12:09 PM