ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 2 - विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी संप पुकारल्याने खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील महाविद्यालये शुक्रवारी बंद आहे. वरिष्ठ महाविद्यालयाच्या एन मुक्टो संघटनेनेही या बंदला पाठिंबा दिला आहे. 1 नोव्हेंबर नंतर सेवेत आलेल्यांसाठी जुनीच पेन्शन योजना लागू करावी , कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना त्वरित अनुदान द्यावे, 2012 पासूनच्या शिक्षकांना नियक्त्या व मान्यता देणे, माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान द्यावे , सातवा वेतन आयोग लागू करावा, 24 वर्षे सेवा झालेल्या सर्व कर्मचा:यांना निवड श्रेणी लागू करारावी यासह विविध मागण्यांसाठी अमळनेरातील प्रताप महाविद्यालयासह सर्वच महाविद्यालयांमध्ये बंद आंदोलन पुकारले आहे. अमळनेर येथे प्रताप महाविद्यालाचे अध्यक्ष सुनील पाटील, सचिव डी एन वानखेडे, पी बी अग्रवाल , आर एस महाजन , सी आर पाटील, बी एल धनगर , बी एस वरोळे , किरण पाटील ,जे एस संदनशिव , व्ही एस पाटील , अलका बोरसे, पी बी पाटील, कामिनी खैरनार, मनीषा पाटील, एम एन भामरे, सविता पाटील, रोहिणी पाटील यांच्या सह सर्व कर्मचारी सहभागी झाले आहे. या बंदमुळे तासिका व कामकाज बंद आहे. एन मुक्टो संघटनेचे व्ही.एस. तुटे यांनीही पाठिंबा दिला आहे.