शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

जिद्द कलियुगातील श्रावण बाळाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 3:35 PM

आठ वर्षे कष्ट करून रहमानने आईला हज यात्रेला पाठवले

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : रस्त्यावर स्टोव्ह सुधारून कुटुंबाची उपजीविका करून त्यातून रोज रुपया रुपया जमवून तब्बल आठ वर्षांनंंतर कलियुगातील श्रावण बाळ रहमानने आपल्या वृद्ध मातेला हज यात्रेला रवाना केले आहे. जन्मदात्या आईवडिलांना अनाथाश्रमात सोडून देणाऱ्या मुलांसाठी रहमान आदर्श ठरला आहे.मुस्लीम धर्मात हजयात्रा करणे म्हणजे पवित्र कार्य समजले जाते. ज्याने हजयात्रा केली आहे त्याला समाजात आदराचे स्थान मिळते. त्यामुळे आपल्या आईलादेखील हजयात्रेला पाठवण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती मनात आणून सुभाष चौकातील एक कोपºयावर उघड्यावर स्टोव्ह दुरुस्तीचा व्यवसाय करणाºया रहमान अरबने आपल्या रोजच्या अल्प कमाईतून जेमतेम उपजीविका करून त्यात किरकोळ रुपया रुपया बचत करण्याचा निश्चय केलारॉकेलवर चालणारा स्टोव्ह कालबाह्य होत चालला आहे. गॅस आणि विद्युत शेगड्या परवडतात आणि रॉकेल मिळणे कठीण त्यामुळे बोटावर मोजणाºया नागरिकांकडे स्टोव्ह असून कधीतरी खराब होतो. त्यामुळे दुरुस्तीला येणाºया स्टोव्हची संख्या कमी कमी झाली. व्यवसाय जेमतेम चालतो. तरी रहमानने चिकाटी सोडली नाही. कोणत्याही परिस्थितीत आपल्या आईला हजला पाठवायचे म्हणून बचत सुरू केली.तब्बल आठ वर्षांनी रहेमानची आई अबेदाबी रशीद अरब (वय ८१ वर्षे) यांना त्यांच्या श्रावण बाळाने नुकतेच हजयात्रेला रवाना केले आहे.रहेमानचे वडील रशीद अरब यांच्या पश्चात सुभाष चौकात रस्त्याच्या कडेलाच मिळेल तेवढ्या रोजगारावर रहेमानने आपला रहाटगाडा ओढला. वडिलांच्या मृत्यूनंतर रहेमान घरात कर्ता झाला. आई, पत्नी, दोन मुुले, एक मुलगी असा सहा जणांचा परिवार तो सांभाळतो. यासाठी घरूनदेखील प्रोत्साहन मिळाले. यामुळे सन २०११ पासून पैसे जमा करण्यास त्याने प्रारंभ केला. कारण हजयात्रेसाठी सुमारे अडीच लाख खर्च अपेक्षित होता. काहीही होवो दरमहा दीड ते दोन हजार रुपये आईसाठी बाजूला काढायचेच, असा निश्चय रहेमानने केला होता. दरम्यानच्या काळात अनेक अडचणीदेखील आल्या, पण तो हरला नाही. २०१२ साली राहेमानने आईचे पासपोर्ट बनविले आणि २०१८ ला हज कमेटीत त्याच्या आईचा नंबर लागला.जमा झालेल्या पैशातून सुमारे दोन लाख २४ हजार रुपये रहेमानने हज कमेटीत भरले व काही पैसे आईला यात्रेसाठी सोबत दिले. असा एकूण अडीच लाखांच्या आसपास रहेमानला खर्च लागला. ४५ दिवसांची हजयात्रा करून २३ सप्टेंबर रोजी आई परतणार असल्याचे रहेमानने सांगितले.दरम्यान, यासंदर्भात रहेमानने बोलताना सांगितले की, मुस्लीम धर्मात हजयात्रेला विशेष असे महत्त्व आहे. केवळ कष्ट्याच्या पैशातूनच ही यात्रा केली जात असते. माझ्याकडे पैसा व मोठा व्यवसाय नसला तरी जिद्द आणि मनस्वी इच्छा होती. प्रत्यक्षात हद्दपार झालेल्या स्टोव्ह दुरुस्तीच्या व्यवसायात स्वत:चे कुटुंब पोसनेही अशक्य आहे. मात्र अल्लामियानेच हे सर्व शक्य केलं. आज केवळ अतिशय गरीब असलेल्यांकडेच स्टोव्ह आहे. अशांच्या घरात किमान दोन वेळचे जेवण कायम बनावे यासाठीच स्टोव्ह दुरुस्तीचा व्यवसाय आपण नियमित सुरू ठेवला असल्याचे रहेमानने भावनिक पणे सांगून या व्यवसायातून जे अपेक्षित होते ते सर्व मिळाल्याने समाधानी असल्याची भावना व्यक्त केली.आजच्या युगात अनेक मुले मोठी झाल्यावर जन्मदेत्या आईवडिलांना अंतर देऊन आपल्या कर्तव्यापासून दूर पळत असतात. अशांना या गरीब रहेमानने कलियुगातील श्रावण बाळ बनून एक शिकवणच आजच्या पिढीला दिली असून, या आदर्शाचे अनुकरण करणे अपेक्षित आहे.

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर