जळगाव : ओव्हरटेक केल्यानंतर बस आणि दुचाकीमधील अंतर कमी राहिल्याचा राग आल्याने दुचाकीस्वारांनी सिनेस्टाईल दुचाकी रस्त्यात उभी करून बस अडविली़ त्यानंतर बसचालक नरेंद्र दिनकर पाटील (रा़ आव्हाणे) व वाहक जिजाबराव पंडित कोळी (रा़ जळगाव) यांना बसच्या बाहेर काढून बेदम मारहाण केली. ही घटना गुरूवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास पिंपळकोठा गावाजळील पिंपरी बुद्रूक गावाच्या फाट्याजवळ घडली़ ग्रामस्थांनी देखील दोघांना मारहाण केल्याने मोठा जमाव त्याठिकाणी जमला होता़ दरम्यान, जमावातील प्रदीप रामचंद्र पाटील (वय-५६, रा़ पिंपरी बु्रदूक) हे सुध्दा जखमी झालेले आहेत़ जळगाव आगाराची बस (क्रमांक एमएच़२०़बी़एल़ २५०८) ही बस नांदुरी यात्रेवरून धुळे-एरंडोल मार्गे जळगावला येत होती. यावेळी पिंपळकोठा जवळ बसवरील चालक नरेद्र पाटील यांनी दुचाकीस्वाराला हॉर्न वाजवून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकी आणि बसमधील अंतर फारच कमी राहिल्यामुळे दुचाकीस्वारांना याचा राग आला़ त्यांनी बसचालकास खेटून का चालवतो असे बोलत शिवीगाळ केली़ त्यानंतर पिंपळकोठा गावाजळील पिंपरी बुदू्रक फाट्याजवळ गाव आल्यानंतर दुचाकीस्वारांनी चक्क सिनेस्टाईल दुचाकी रस्त्यात उभी करून बस अडविली़ त्यानंतर चालक व तरूणांमध्ये शाब्दीक वाद झाला़ वादाचे रूपांतर हाणामारीत झाली़ आधी त्यांनीच मारहाण केली हाणामारीच्यावेळी जमावातील प्रदीप रामंचद्र पाटील यांना देखील मारहाण झाली़ दरम्यान, बसचालक व वाहकानेच आधी मारहाण केल्याचे ग्रामस्थांनी जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्यावर सांगितले़ पिंपरी बुद्रूक येथील सरपंच देखील रूग्णालयात हजर झाले होते़ दरम्यान, आपणास दुचाकीचालक प्रदीप पाटील यांनी शिवीगाळ केली नंतर मारहाण केल्याचा जबाब बसचालकाने पोलिसांना दिला आहे. प्रदीप हे भाजपाचे तालुकाध्यक्ष एस.आर. पाटील यांचे मोठे भाऊ असल्याची माहिती मिळाली. दोघांना मारहाण, बस जाळण्याची धमकी तरूणांनी बसचालक नरेंद्र यांना बाहेर काढून मारहाण केली़ त्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी देखील त्याठिकाणी धाव घेतली़ चालकाना वाचविण्याऐवजी चक्क त्यांनी चालकाला मारहाण करण्यास सुरूवात केली़ एवढेच नव्हे तर बसमध्ये जाऊन वाहक जिजाबराव कोळी यांना लोखंडी रॉडने हातावर मारहाण केली़ संतप्त झालेल्या जमावाने चक्क बस जाळण्याची धमकी सुध्दा दिली़ एकाने बसचा पुढील भागाचा काच फोडला़ अन्यथा मोठा अनर्थ घडला असता़़़ अगोदर झालेल्या हाणामारीचे रूपांतर नंतर मारहाणीत झाल्यानंतर बसचालक व वाहक हे गंभीर जखमी झाले होते़ एवढ्यात आरटीओ कार्यालयाचे अधिकारी हे महामार्गावरून जात असताना त्यांना मारहाणीचा प्रकार दिसला़ त्यांनी वेळीच त्या ठिकाणी धाव घेऊन जमावाला पांगविले़ त्यानंतर बसचालक व वाहकास आपल्या वाहनात बसवून एरंडोल रूग्णालयात नेले़ आरटीओ अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ मात्र ठळला़ वाहकाजवळील पैसे गायब... जमावाकडून मारहाण होत असताना वाहक जिजाबराव कोळी यांच्याजवळील आठशे रूपये कुणीतरी चोरून नेले़ दरम्यान, मारहाणीत चालक नरेंद्र यास नाकाला आणि छातीला मार बसला आहे तर वाहक जिबाबराव यांच्या हाताला फॅक्चर झाले आहे़ दुपारी एरंडोल रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर दोघांना जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले होते़ एसटीच्या अधिकाऱ्यांनी सुध्दा जखमींची भेट घेतली़
बस अडवून चालक, वाहकाला जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:37 PM