आॅनलाईन लोकमतअमळनेर, दि. १ : भारतीय राष्ट्रीय अकादमीतर्फे दिला जाणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार अमळनेर तालुक्यातील कंडारी येथील ज्योत्स्ना संतोष लोहार यांना दिल्ली येथे १० डिसेंबर रोजी प्रदान करण्यात आला.लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष जय सुमनाक्षर, खासदार जया बच्चन, केंद्रीय गृह मंत्री हंसराज अहिर, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री शहनाज हुसेन, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार ए.टी.पाटील यांच्या उपस्थितीत सन्मान झाला. ज्योत्स्ना लोहार यांनी पती संतोष लोहार व मुले दर्शन व साक्षी यासह पुरस्कार स्विकारला.ज्योत्स्ना लोहार या कंडारी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या आहेत. त्या गेल्या काही वर्षांपासून बेटी बचाव बेटी पढाव कार्यकर्त्या म्हणून त्या कार्यरत आहेत. आपली कौटुंबिक जवाबदारी सांभाळून त्यांनी हे कार्य सुरु केले. अनेक गावांत त्यांनी विविध कार्यक्रम घेऊन या विषयावर जनजागृती केल्याने परिसरातील अनेक मुली शिक्षणाच्या प्रवाहात येऊन साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
कंडारी येथील ज्योत्स्ना लोहार सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 4:48 PM
बेटी बचाव बेटी पढाव मोहिमेत उत्कृष्ठ काम केल्यामुळे दिल्ली येथे झाला सन्मान.
ठळक मुद्देज्योत्स्ना लोहार या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या उपक्रमातंर्गत केली जनजागृतीअनेक गावांत विविध कार्यक्रम घेऊन जनजागृती