जळगाव : मू.जे.महाविद्यालयाचा खून झालेला विद्यार्थी मुकेश मधुकर सपकाळे (२३, रा.आसोदा) हा कबड्डीचा उत्कृष्ट खेळाडू होता. त्यामुळे राष्टÑीय पातळीवरील स्पर्धांमध्ये देखील त्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. अनेक बक्षीसे त्याला मिळाली आहेत. इतकेच नव्हे तर मुकेशच्यानिमित्ताने आसोदाचे नाव राष्टÑीय पातळीवर पोहचले.मू.जे.महाविद्यालयाच्या पार्कींगमध्ये मुकेश याचा शनिवारी चॉपरने भोसकून खून झाला होता. त्याच्या खुनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.२५च्यावर पारितोषिकेमुकेश नेमका कोण होता, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी काय? याची माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने आसोदा येथे जावून कुटुंबियांची भेट घेतली.वडील मधुकर सपकाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मुकेश हा कबड्डीचा राष्टÑीय खेळाडू होता. या खेळात त्याला तालुका, जिल्हा, राज्य व राष्टÑीय पातळीवर गौरविण्यात आले असून २५च्यावर पारितोषिके मिळाली आहेत. मुकेशच्या मृत्यूच्या दु:खातून कुटुंबीय अजूनही सावरलेले नाही. घरात शोकाकूल वातावरण असून मुकेशच्या आठवणींनी अनेकांचा कंठ दाटून येतो.आर्थिक परिस्थिती जेमतेम, पण स्वप्न मोठेमुकेश याचे वडील मधुकर शंकर सपकाळे जळगावील एका हॉटेलमध्ये इलेक्ट्रीकलचे काम करतात. आई सुनिता गावातच शेतात मजुरीचे काम करते. मुकेश हा वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षाला मू.जे.महाविद्यालयात होता. दुसरा भाऊ रोहीत हा गावातच सेतूचे काम करुन कुटुंबाला हातभार लावतो तर सर्वात लहान सौरव याने ११वीसाठी मू.जे.महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. सपकाळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मुलांना शिकवून मोठे करण्याचे स्वप्न वडीलांनी पाहिले होते व त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याला मुकेशच्या रुपाने सुरुवातही झालेली होती. मात्र नियमितीला वेगळेच मान्य होते, त्यामुळे त्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले.गावात सुरु केली कबड्डीआसोदा गावात कबड्डी कोणी खेळत नव्हते, मात्र मुकेशने या खेळात स्वत:चे अस्तित्व सिध्द करुन गावाचे नाव राष्टÑीय पातळीवर नेल्याने इतर तरुणांमध्ये त्याने उत्साह निर्माण केला होता. गावात स्वत:च कबड्डीचे मैदान तयार करुन तो इतर मुलांचा सराव करीत होता. इतकेच काय सर्वोदय क्रीडा मंडळाची त्याने स्थापना केली होती. या मंडळाच्या माध्यमातून स्पर्धांमध्ये तो सहभाग घेत होता. मुकेश हा सहावीपासून कबड्डीच्या खेळाकडे वळला. कोणतेही क्षेत्र असो त्यात स्वत: ला झोकून प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश हमखास मिळते हाच संदेश तो इतर तरुणांना देत होता व त्याच उद्देशाने स्वत:चीही वाटचाल करीत असल्याचे गावातील सामाजिक कार्यकर्ते रवी देशमुख यांनी सांगितले.
कबड्डीतून मुकेश सपकाळेने पोहचविले आसोद्याचे नाव देश पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 12:25 PM