लोकमत न्यूज नेटवर्कभुसावळ, दि.१८ : गावाच्या विकासासाठी एका ग्रा.पं.मध्ये किमान तीन वर्षासाठी ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात येते. शहराला लागून असलेल्या कंडारी येथील प्रकार मात्र नेमका उलट्या दिशेने होत असल्याचे दिसून येत आहे. या ग्रा.पं.तीला कायमस्वरुपी ग्रामसेवक मिळत नसल्यामुळे तीन वर्षात तब्बल १८ ग्रामसेवकांनी कारभार सांभाळल्याची ऐतिहासिक नोंद पंचायत समितीच्या दप्तरी करण्यात आली आहे.जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही एवढे ग्रामसेवक बदलविण्याची हे एकमेव दूर्मीळ उदाहरण असलेल्या ग्रा.पं.तीमध्ये दोन महिन्यात प्रभारी पदभार सांभाळणारा ग्रामसेवक गावाचा विकास साधणार तरी कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.दरम्यान, कायमस्वरुपी ग्रामसेवक मिळावा यासाठी २५ आॅगस्ट २०१६ रोजी ग्रामस्थांनी मोर्चा काढला होता. तरीही जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे अनेक योजनांचे बारा वाजले आहे तर नागरिकांना कायमच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे.२०१५ ला आठ तर २०१६ ला मिळाले सात ग्रामसेवककंडारी या गावाची लोकसंख्या सुमारे १५ हजार आहे. येथे २०१५ पासून कायमस्वरुपी ग्रामसेवक नसल्यामुळे गावाच्या विकासालाच खिळ बसली आहे. २०१५ साली येथे व्ही.आर.लढे, एस.एन.नारखेडे, एल.एस.नहाले, ए.डी.खैरनार, बी.के.पारधी, बी.आर. बारेला, डी.सी.इंगळे व पी.आर.तायडे या आठ ग्रामसेवकांनी प्रभारी पदभार सांभाळला. तर २०१६ साली डी.सी. इंगळे, आर.यु.काठोके, एल.एस. नहाले, आर.ए.चौधरी व डी.आर. बारेला या सात ग्रामसेवकांनी कामकाज पाहिले. तर २०१७ साली ए.डी.खैरनार, एस.एन.नारखेडे या दोन ग्रामसेवकांनी कामकाज पाहिले. २०१८ सालात गेल्या तीन महिन्यापासून पी.टी.झोपे हे कामकाज पाहत आहे. त्यांच्याकडे कुºहे (पानाचे) ग्रामपंचायतीची जबाबदारी असल्यामुळे येथील पदभार काढून घ्यावा, अशी विनंती पत्र त्यांनी गटविकास अधिकारी एस.बी.मावळे यांना दिले आहे.जि.प.प्रशासनाकडून दुर्लक्षगेल्या तीन वर्षात पं.स.कडून जिल्हा परिषदेला कंडारी येथे ग्रामसेवक मिळावा म्हणून प्रस्ताव पाठवला जातो. जि.प.ने मात्र दरवर्षी होणाऱ्या बदली प्रक्रियेमध्ये एकदाही या संदर्भात विचार केला नसल्याचे दिसून येते. दरम्यान, गट विकास अधिकारी मावळे यांच्याशी संपर्क साधला असता २५ मे रोजी येथे कायमस्वरुपी म्हणून बारेला यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहे. महिना उलटला तरीही ते हजर झाले नाही. त्यामुळे ते किती काळ काम करणार हा संशोधनाचा विषय आहे.१४ व्या वित्त आयोगाचा निधी अद्याप पडूनयेथे १४ व्या वित्त आयोगातून एक कोटी आठ लाख रुपये मंजूर आहे. या निधीतून अद्याप केवळ प्रशिक्षण व कचरा कुंडी एवढेच काम झाले आहे तर काही कामांसाठी ग्रामपंचायतीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मागासवर्गीय वस्तीतील पाईप लाईनच्या ई-टेंडरचा प्रश्न प्रलंबित आहे.पाणी टंचाईचे संकट कायमकंडारी हे गाव तापी नदीच्या काठावर आहे. मात्र येथे आतापर्यंत अनेक योजना राबवूनही कायम पाणी टंचाई असल्याच्या तक्रारी आहे. कायमस्वरुपी ग्रामसेवक नसल्यामुळे योजनांचा बोजवारा उडाला आहे.
भुसावळ तालुक्यातील कंडारीला तीन वर्षात मिळाले १८ ग्रामसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 1:21 AM
कंडारी ता. भुसावळ येथील ग्रामपंचायतीचा अजब कारभार समोर आला असून अवघ्या तीन वर्षात येथे १८ ग्रामसेवक बदलून गेल्याची बाब समोर आली असून यामुळे गावाचा विकास ठप्प झाल्याचा आरोप केला जात आहे.
ठळक मुद्दे१४ व्या वित्त आयोगाचा निधी अद्याप पडूनकायमस्वरुपी ग्रामसेवक मिळावा यासाठी २५ आॅगस्ट २०१६ रोजी ग्रामस्थांनी मोर्चा होता काढला पाणी टंचाईचे संकट कायम