जळगाव, दि.4 - डांभुर्णी (ता.यावल, जि. जळगाव) येथील स्थानिक कलाकारांची निर्मिती असलेल्या कंदील या लघुपटाला 7 आर.सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये राज्यस्तरावर तृतीय बक्षीस जाहीर झाले आहे. डांभुर्णी येथील नवोदित कलाकारांची भूमिका असलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन डांभुर्णी येथील योगेश पाटील या तरुणाने केले आहे.
देशभरातील १२०० लघुपटांचा सहभाग7 आर. सी. फिल्म्स या संस्थेतर्फे मराठी लघुपटांसाठी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी कंदील लघुपटासह देशभरातून तब्बल १२०० लघुपटांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत वोटींग पोलच्या पर्यायासह परीक्षण करण्यात आले. खान्देशातून कंदील हा एकमेव लघुपट तृतीय क्रमांकाच्या बक्षीसाचा मानकरी ठरला.
सर्वच कलावंत नवोदितया लघुपटात भूमिका केलेले सर्वच कलाकार डांभुर्णी येथील असून त्यांनी यापूर्वी अभिनय केलेला नाही. मधुकर पाटील यांनी प्रमुख व्यक्तीरेखा साकारली आहे. तसेच कोमल पाटील, भूषण पाटील, विकास पाटील व गावातील काही नागरीकांनी अभिनय केला आहे. गावातील तरुण व लहान मुलांना सोबत घेऊन अभिनयाचे प्रशिक्षण देऊन योगेश पाटील व त्यांच्या सहकाºयांनी हा लघुपट साकारला आहे.
कथालय थिएटरची निर्मितीया लघुपटाची निर्मिती कथालय व गुरु थिएटर या संस्थेतर्फे करण्यात आली आहे. यात चित्रीकरणाची जबाबदारी रक्षंत हिंगणेकर यांंनी तर सहायक दिग्दर्शन प्रशांत चौधरी यांनी केले आहे. या लघुपटासाठी जळगाव येथील धनंजय धनगर व जामनेर येथील चंद्रकांत भोईटे यांचे सहकार्य लाभले.कंदील ही ग्रामीण वृद्धाची कथाकंदील हा लघुपट एक म्हाता-या शेतक-याची कथा आहे. माझ्या जगण्याचा अविभाज्य घटक असलेले लोक या लघुपटाच्या कथेतील पात्र आहेत. कंदीलच्या निमित्ताने मी अजून त्यांच्या जवळ गेलो आहे. मला या यशाचा आनंद तर आहेच पण या नंतर नवीन अजून दर्जेदार काम करण्याची जबाबदारी वाढली आहे. या नंतरही आम्ही उत्तम काम करण्याचा प्रयत्न करत राहू. - योगेश पाटील, दिग्दर्शक, डांभूर्णी.