जामनेर, जि.जळगाव : कांग नदीच्या उगमस्थळी होत असलेल्या जोरदार पावसामुळे बुधवारी दुपारी नदीला मोठा पूर आला. भुसावळ रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने जामनेर-भुसावळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ओझर गावाजवळ बांधण्यात आलेला पूल पाण्याखाली गेल्याने या गावाचा संपर्क तुटला.गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसाने कांग दुथडी भरुन वाहत होती. गोद्री, ता.जामनेर व सावळतबारा भागात झालेल्या पावसाने दुपारी मोठा पूर आला.जामनेर शहरातील भुसावळ रस्त्यावरील पुलावरुन पाणी गेल्याने वाहतूक बंद पडली. गर्दी वाढल्याने पोलिसांनी धाव घेतली. गेल्या पाच वर्षांतील हा सर्वात मोठा पूर असल्याने नागरीकांची पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.नदी काठावरील घरात पाणी शिरलेकांग नदीला सायंकाळी मोठा पूर आल्यानंतर शहरातील दोन्ही पूल पाण्याखाली बुडाले. नदी काठावर बिस्मील्ला नगर परिसरात गलाठी नाल्यावरील घरात पुराचे पाणी शिरत असल्याचे पाहुन नागरिकांनी घरातील सामान व जिवनावश्यक वस्तू बाहेर काढल्या. या भागात सात ते आठ घरे असून रहिवाशांना सुरक्षीत स्थळी हलवले. दरम्यान, फत्तेपूर, ता. जामनेर येथील कांग नदीवरील गावातील पूलदेखील दुपारी चार वाजेपासून पाण्याखाली असल्याची माहिती मिळाली.
कांगच्या पुराने जामनेरचा पूल पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 9:22 PM
कांग नदीच्या उगमस्थळी होत असलेल्या जोरदार पावसामुळे बुधवारी दुपारी नदीला मोठा पूर आला. भुसावळ रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने जामनेर-भुसावळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
ठळक मुद्देओझरचा संपर्क तुटला वाहतूक खोळंबली