ऑनलाईन लोकमत / विजयकुमार सैतवाल
जळगाव, दि. 13 - वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर अनेक वस्तूंचे भाव वधारले असताना यातून पूजेचे साहित्यही सुटलेले नाही. जास्त वापर नसला तरी दररोज घरोघरी व मंदिरात सकाळ-संध्याकाळ देवापुढे ज्योत लावली जाते त्या कापूरचे भाव थेट दीडपटीने वाढले आहे. अगोदर मूळ किंमतीत वाढ जीएसटी लागू होण्यापूर्वीच कापूरच्या मूळ किंमतीत भाववाढ झाली. पूर्वी 400 ते 450 रुपये प्रति किलो असणा:या कापूरचे भाव 100 रुपये प्रति किलोने वाढून त्याचे भाव 500 ते 550 रुपये किलोवर पोहचले. चार महिन्यात सात टन कापूरचा वापरकापूराचा वर्षभर वापर केला जात असतो. त्यात सध्या व्रतवैकल्यांचा श्रावण मास सुरू असून याच महिन्यापासून चार महिने कापराचा सर्वाधिक वापर केला जात असतो. एकटय़ा जळगाव जिलत श्रावणाचे दिवस ते दिवाळी अशा चार महिन्याच्या कालावधीत तब्बल सात टन कापूरचा वापरला जात असल्याचे काही विक्रेत्यांशी संपर्क साधला असता समजले. परराज्यातून मोठय़ा प्रमाणात आवकजळगावच्या बाजारपेठेत मुंबई, नागपूर यासह चेन्नई, उज्जैन, अहमदाबाद येथून मोठय़ा प्रमाणात कापूर येतो. येथून तो विविध तालुक्यांच्या ठिकाणी विक्री साठी पाठविला जात असतो. पूर्वी जळगावातील व्यापारी ललित बरडिया हे कापूरची निर्मिती करीत असत, मात्र याची मजुरी वाढल्यामुळे हे उत्पादन बंद करण्यात आल्याचे बरडिया यांनी सांगितले. त्यापेक्षा आता तयार माल येत असल्याने त्याचाच व्यापार केला जातो, असेही ते म्हणाले. शहरातील काही घाऊन व्यापा:यांकडून हा कापूर तालुक्यांच्या ठिकाणी विक्रीसाठी जात असतो. 18 टक्के थेट जीएसटीजीएसटी लागू होण्यापूर्वी कापूरवर कर नव्हता. मात्र 1 जुलैपासून त्यावर थेट 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे आधीच 500 ते 550 रुपये किलोवर पोहचलेल्या कापूरचे भाव आता 600 ते 625 रुपये प्रति किलो झाले आहे. एकूणच पूर्वीच्या भावामध्ये थेट दीडपट वाढ झाली आहे.
जीएसटी टाळण्यासाठी अनोखी शक्कलकापूरवर जीएसटी लावण्यात आल्याने भेसळयुक्त कापूरची निर्मितीही होऊ लागली आहे. त्यामुळे त्याची कमी दरात विक्री होत असल्याचे व्यापा:यांचे म्हणणे आहे. जो अस्सल कापूर असतो, तो पूर्ण जळतो, मात्र भेसळयुक्त कापूर जळाल्यानंतर शेवटी राख शिल्लक राहते, ही भेसळयुक्त कापूरची ओळख असल्याचे सांगितले जाते. अगरबत्तीचे भाव स्थिरपूजेसाठी आवश्यक असलेल्या अगरबत्तीवरदेखील 5 टक्के जीएसची आहे. याचा उलट उत्पादकांना फायदा झाल्याचेही चित्र आहे. कारण पूर्वी अगरबत्तीसाठी आवश्यक रसायनासाठी उत्पादन शुल्क व इतर कर मिळून 18 ते 28 टक्के कर होता.आता जीएसटी केवळ 5 टक्के असल्याने कर कमी झाल्याचा फायदा आहे. जीएसटी लागला तरी अगरबत्तीच्या भावात वाढ झालेली नाही. पूर्वी कापूरवर कर लागत नव्हता. आता 18 टक्के जीएसटी लागत आहे. त्यात मूळ किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे कापूरचे भाव जवळपास दीडपटीने वाढले आहेत. श्रावण मास ते दिवाळीर्पयत चार महिन्यात जळगाव जिल्ह्यात 7 टन कापूर वापरला जातो.-ललित बरडिया, कापूर व्यापारी तथा माजी अध्यक्ष, एकता रिटेल किराणा असोसिएशन