जळगाव- भुसावळ-भादली दरम्यान ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरु असल्याने महिनाभरापासून भुसावळ-नाशिक शटल, कामायानी एक्सप्रेस आणि आजपासून वाराणसी येथे सुरु असलेल्या कामासाठी आठवडाभर गोरखपूर काशी एक्सप्रेस बंद राहणार आहे. यामुळे चाकरमान्यांचे अधिकच हाल होणार आहेत.गाडी क्रमांक १५०१८ ही वाराणसी येथून सुटणारी गोरखपूर-काशी एक्सप्रेस ट्रॅक दुरुस्तीच्या कामामुळे १४ ते २० जुलै दरम्यान बंद राहणार आहे. या गाडीची जळगाव स्थानकावर दररोज सकाळी पावणे अकरा वाजता येण्याची वेळ असल्याने, मुंबईकडे जाणारे बहुतांश प्रवासी व चाळीसगाव, पाचोरा चाकरमानी व विद्यार्थ्यांसाठी सोयीची गाडी आहे. तसेच मुंबईकडून येणारी गाडी क्रमांक १५०१७ ही काशी एक्सप्रेसदेखील १६ ते २२ जुलै दरम्यान बंद ठेवण्यात आली आहे.ही गाडी दररोज जळगाव स्थानकावर दुपारी दीडला येत असल्याने, बºहाणपूर,खंडवा येथे जाणाऱ्या प्रवाशासांठी अत्यंत सोयीची आहे. मात्र, ही गाडीदेखील आठवडाभरासाठी बंद केल्याने, आता चाकरमान्यांना खासगी वाहनाने दुप्पट भाडे खर्च करुन, प्रवास करावा लागणार आहे.
काशी एक्सप्रेस आठवडाभर बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 6:52 AM