जळगाव : तालुक्यातील गिरणा व तापी नदीच्या मधोमध असलेल्या गाढोदा येथील रामचंद्र सीताराम पाटील यांनी आपल्या शेतात पारंपरिक व आधुनिक शेतीचा संगम घालत आज वडिलोपार्जित शेतीला आधुनिकतेची जोड दिली. जिल्ह्यापर्यंत ओळखली जाणारी गाढोद्याची केळीचा आता काश्मिर ते उत्तरप्रदेशपर्यंत पुरवठा केला जात आहे.रामचंद्र पाटील यांचे वडील सिताराम पाटील यांच्याकडे १६ बिघे जमीन होती. या वडिलोपार्जित जमिनीत त्यांनी आधूनिकतेची जोड दिली. गिरणा व तापी नदीच्या काठालगत केळीचेच पीक मुख्यत्वेकरून घेतले जाते. मात्र, हे पीक घेताना अनेकदा निसर्गाच्या प्रकोप देखील शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत केळी पीक हे बेभरवशाचेच पीक समजले जाते. हवमानाचा अभ्यास, वादळ किंवा जास्त तापमानाचा फटका केळीला बसणार नाही यासाठीची उपाययोजना करत ते केळीची लागवड करतात.स्वत:च पिकवतात व स्वत:च विकतातअनेकदा शेतकऱ्यांची व्यापा-यांकडून फसगत किं वा नुकसान होत असते. शेतकरी जोपर्यंत आपल्याच मालाला बाजार मिळवून देणार नाही तो पर्यंत त्याची व्यापाºयांकडून फसगत ही होणारच असते. हे ओळखून त्यांनी आपल्या शेतीत लागवड करून घेतलेल्या केळी स्वत:च बाजारात न्यायला सुरुवात केली. यासाठी मोठा मुलगा निलेश पाटील प्रयत्न करत असून, केळी व्यापारी किंवा एजंटच्या माध्यमातून विक्री करीत स्वत:चा व्यवसाय सुरु करत वेगवेगळ्या राज्यांमध्ये गाढोद्याच्या केळीचा पुरवठा करत आहेत. तो आता काश्मीर आणि उत्तरप्रदेशातही केळी पाठविली जात आहे. शेतकºयांनी आता व्यापारी किंवा शासनाच्या भरवश्यावर न राहता आपल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.मेहनतीमुळे १६ बिघे जमीनीचे झाले ६० बिघेरामचंद्र पाटील यांना वारसाहक्काने मिळालेल्या १६ बिघे जमीनीत केळीची लागवड करत गेल्या २० वर्षांमध्ये १६ बिघे जमीनीचे रुपांतर ६० बिघे जमिनीत केले असून, सध्यस्थितीत ते ३७ बिघे जमिनीवर केळीची लागवड करतात. यासह कापूस, मका, ज्वारी हे पीक देखील घेत असतात. मात्र, जमिनीचे काही क्षेत्र ते दरवर्षी शेतीतील वेगवेगळ्या प्रयोगांना चालना देण्यासाठी राखीव ठेवतात. या जमीनीत हळद, तीळ, फळबाग किंवा इतर धान्य घेत आधुनिक शेतीचे प्रयोग ते करीत असतात.शेतकरी जोपर्यंत पारंपरिक पध्दतीने शेती करत राहिंल तोपर्यंत शेती शेतकºयांना परवडणार नाही. शेतकºयांनी शेतीत प्रयोग करत आधूनिक व पारंपरिक शेतीचा मेळ घालणे गरजेचे आहे.-रामचंद्र पाटील, शेतकरी , गाढोदा ता. जळगाव.
गाढोद्याची केळी पोहचली काश्मिरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:11 PM