शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

कस्तुरबा आणि शेळीचे दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 1:14 PM

मार्च १९१८ साल. साबरमती येथे गांधीजी खूप आजारी होते. कस्तुरबा त्यांची काळजी वहात होती. तिचा चेहरा गरीब गाईसारखा दिसत होता. तिच्यातल्या हळुवारपणामुळे गांधीजी भारावून गेले. यामुळे त्यांना तमाम बाबतीत दिलासा मिळत होता. सैनिक भरतीचे काम सुरू होते. या काळात त्यांचा आहार साधा होता. एकदा बरे वाटत नव्हते. दुसरा दिवस सणाचा ...

मार्च १९१८ साल. साबरमती येथे गांधीजी खूप आजारी होते. कस्तुरबा त्यांची काळजी वहात होती. तिचा चेहरा गरीब गाईसारखा दिसत होता. तिच्यातल्या हळुवारपणामुळे गांधीजी भारावून गेले. यामुळे त्यांना तमाम बाबतीत दिलासा मिळत होता. सैनिक भरतीचे काम सुरू होते. या काळात त्यांचा आहार साधा होता. एकदा बरे वाटत नव्हते. दुसरा दिवस सणाचा होता. गांधीजींनी सांगून ठेवले होते की ते जेवणार नाहीत. कस्तुरबाने आग्रह धरलाअसे कसे? एवढा सणाचा दिवस आणि उपवास कसा बरे करता येईल? आज तर गोरगरिबांच्या घरीही आनंद असतो. काही तरी खायला हवे. तुमच्या आवडीची लापशी केली आहे. थोडी मुगाची उसळ घ्या. थोडे खा.’कस्तुरबाच्या आग्रहामुळे गांधीजी जेवायला बसले. अन्नाला अन्नपूर्णेच्या हातची चव होती. ते पोटभर जेवले. कस्तुरबाच्या हातची लापशी. मुगाच्या उसळीला खमंग फोडणी होती. गांधीजींना गाजरे आवडायची. जेवण आटोपले. तास लोटला नाही तोच गांधीजींना त्रास सुरू झाला. तिने विश्रांतीचा आग्रह केला. गांधीजी काही मानले नाहीत. त्यांना कामांचा डोंगर उपसायचा होता. रात्री नडियादला जायचे होते. साबरमती स्टेशनवर ते पायी चालत निघाले. ते सव्वा मैलांचे अंतर होते. त्यांचे दुखणे वाढत चालले होते. अखेर आश्रमात परतावे लागले. पाण्याचे प्रयोग सुरू झाले. कस्तुरबा तर दमून गेली. आजार थांबायचे काही नाव घेईना. दूध घेणे फार गरजेचे होते. गांधीजींचा तर ठाम नकार होता. डॉक्टर दलाल विचारत होते-‘तुम्ही दुधाचे सेवन का बरे करत नाही?’‘गाई-म्हशींवर फुंकरीची प्रक्रिया होते. यामुळे मला दूध नकोय. तो माणसाचा आहार होऊ शकत नाही. मी दुधाचा त्याग केला आहे.’गांधीजींचे हे उत्तर कस्तुरबाला माहीत होते. येथवर तर ते पाठही झाले होते. ती गांधीजींच्या खाटेशेजारीच तर उभी होती. ती म्हणाली,‘हे तुमचे ठरले आहे, हे खरे आहे. अगदी असेच ठरवले असेल तर शेळीचे दूध घेता येईल.’डॉक्टरांनी हे ऐकले. ते खूप खूश झाले. आनंदून म्हणाले,‘मग तर माझे काम झाले. शेळीचे दूध घेतले तरी चालेल.’ गांधीजी हसले. हसत म्हणाले,‘कस्तुर आहेच आमची डॉक्टरीण.’गांधीजी खूश झाले. कस्तुरबा लाजली. डॉक्टर हसले. आनंदाच्या लहरी उसळल्या. (क्रमश:)- प्रा.विश्वास पाटील

टॅग्स :Jalgaonजळगाव