जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या १० अभ्यास मंडळाच्या मंगळवारी बैठका झाल्या. यामध्ये सात अभ्यास मंडळाचे अध्यक्ष बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले तर तीन तदर्थ अध्यक्ष जाहीर करण्यात आले. विद्यापीठात सकाळी या अभ्यास मंडळाची बैठक झाली. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी सर्व अभ्यास मंडळाच्या सदस्यांना मार्गदर्शन केले. निवडणूक निर्णय अधिकारी तथ कुलसचिव डॉ. विनोद पाटील, निवडणूक विभागप्रमुख आर. आय. पाटील, डॉ. मुनाफ शेख, राजेश ठाकरे, प्रवीण चंदनकर, आधार कोळी आणि निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
अभ्यास मंडळाचे बिनविरोध अध्यक्ष पुढीलप्रमाणे : मानव्यविद्या शाखा : मराठी : डॉ. किशोर सोनवणे (महात्मा गांधी महाविद्यालय, चोपडा), हिंदी : डॉ. संजयकुमार शर्मा (कला व वाणिज्य महाविद्यालय, तळोदा), इंग्रजी : डॉ. भूपेंद्र केसूर (मु. जे. महाविद्यालय, जळगाव), इतिहास : डॉ. प्रशांत देशमुख (गरूड महाविद्यालय, शेंदूर्णी), मानसशास्त्र : प्रा. चंद्रमणी लभाणे (मू. जे. महाविद्यालय, जळगाव), अर्थशास्त्र : डॉ. जितेंद्र तलवारे (एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालय, धुळे)
आंतरविद्या शाखा : शिक्षणशास्त्र : डॉ. हेमंतकुमार देवरे (धुळे एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, धुळे), समाजशास्त्र : तदर्थ अध्यक्ष प्रा. अरविंद पाटील (कला व वाणिज्य महाविद्यालय, सोनगीर), संरक्षणशास्त्र : तदर्थ अध्यक्ष डॉ. कन्हैयालाल पाटील (एच. आर. पटेल महाविद्यालय, शिरपूर), राज्यशास्त्र : तदर्थ अध्यक्ष डॉ. विजय तुंटे (प्रताप महाविद्यालय, अमळनेर).
याआधी १५ अभ्यास मंडळांसाठी निवडविद्यापीठाच्या १५ अभ्यास मंडळांच्या सोमवारी बैठका झाल्या. यामध्ये तीन अभ्यास मंडळांच्या अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. गुणवंत सोनवणे, डॉ. मनोजकुमार चोपडा आणि डॉ. मधुकर पाटील हे अनुक्रमे रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र विषयांच्या अध्यक्षपदी निवडून आले होते. उर्वरित १२ अभ्यास मंडळांचे अध्यक्ष बिनविरोध निवडून आले होते.