चाळीसगाव, जि.जळगाव : आदिवासी दिनानिमित्त पाचोरा येथील दैवयोग मंगल कार्यालयात रविवारी १२ आॅगस्ट रोजी काव्यसंमेलन होणार आहे. अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. वाल्मीक अहिरे, तर स्वागताध्यक्षपदी मेहुणबारे-दहीवद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या मोहिनी गायकवाड असतील.आदिवासी साहित्य अकादमी व नक्षत्रांचे देणे काव्य मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. काव्य संमेलनाचे उदघाटन स्वागताध्यक्षा मोहिनी गायकवाड यांच्या हस्ते होईल. संमेलनास डॉ. मिलिंद बागूल, अकादमीचे अध्यक्ष व कवी सुनील गायकवाड, डॉ.शिवाजी हुसे, डॉ. संजय लोहकरे, डॉ. साधना निकम, के. के. आहिरे, प्राचार्य शिवाजी साळुंखे, वसंत गायकवाड , विश्राम वळवी, रमजान तडवी, जया नेरे, ललिता पाटील, गौतमकुमार निकम, विजय गायकवाड, चुडामण सोनवणे, प्रा. जितेंद्र सोनवणे, योजना निकम, संजय बहिरम व स्थानिक कवी व साहित्यिक उपस्थित राहणार आहे. साहित्यिक व रसिकांना उपस्थित राहण्याचे अवाहन चाळीसगाव येथील कवी दिनेश चव्हाण यांनी केले आहे.सेल्वासला अ.भा.आदिवासी साहित्य संमेलनआदिवासी साहित्य अकादमीतर्फे सेल्वास येथे अखिल भारतीय स्तरावरील साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तयारी अंतीम टप्प्यात असल्याची माहिती सुनील गायकवाड यांनी दिली. यासाठी अकादमीतर्फे देशभर जनजागृती करण्यासाठी साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
पाचोऱ्यात रविवारी रंगणार काव्यमैफिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 11:48 PM