मुरलीने सांगितला सेहवागचा किस्सा
नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा २००९ मध्ये कसोटी सामन्यात २९३ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर त्याने म्हटले होते की, ‘आता या पुढे मी द्रवीडचे कधीच ऐकणार नाही.’ मुथय्या मुरलीधरन याने याबाबतचा किस्सा सांगितला. सेहवाग २८० धावांवर असतांना द्रविडने त्याला शांतपणे खेळायला सांगितले तसेच तो दुसऱ्या दिवशी ३०० धावा पूर्ण करू शकतो, असा सल्लाही दिला. सेहवागने त्याचे ऐकले आणि २९३ धावांवर असताना तो बाद झाला. त्यानंतर सेहवागने असे म्हटले होते, असेही मुरलीधरनने सांगितले.
ठाकूर यांनी केले टे. टे. खेळाडूंचे कौतुक
नवी दिल्ली : भारतीय टेबल टेनिस खेळाडू मनिका बात्रा आणि जी साथियान यांनी डब्ल्यूटीटी कंटेंडरमध्ये मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले. त्यानंतर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी या खेळाडूंचे कौतुक केले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘मनिका आणि साथियान तुम्ही खूप छान खेळ केला.’ या विजयासोबतच या स्पर्धेत जेतेपद पटकावणारे ते पहिलेच खेळाडू ठरले. त्यांना स्पर्धेच्या आधी पाचवे मानांकन देण्यात आले होते.