जळगावातील गोलाणी मार्केटला 4 दिवस टाळे
By admin | Published: July 16, 2017 11:54 AM
या चार दिवसानंतर मार्केटची पाहणी करण्यात येणार असून समाधानकारकस्थिती आढळून न आल्यास हे आदेश 19 जुलैनंतरही कायम राहतील
ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 16 - गोलाणी मार्केट व परिसरात प्रचंड अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने या मार्केटसह परिसरातील गाळे 16 ते 19 जुलैर्पयत बंद ठेवण्याचे आदेश शनिवारी प्रांताधिकारी जलज शर्मा यांनी काढले. 19 जुलैर्पयतही स्वच्छतेबाबत समाधानकारक स्थिती आढळून न आल्यास हे आदेश पुढेही कायम राहू शकतात. दरम्यान, शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी पाहणी केल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली. गोलाणी मार्केटमध्ये गाळेधारकांचे साफसफाईकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. परिणामी ग्राहकांचे व रहिवाश्यांचे अतोनात हाल होत असल्याची तक्रार शहरातील शरद जगन्नाथ काळे यांनी प्रशासनाकडे केली होती. त्याची दखल घेत आधी प्रांताधिका:यांनी व नंतर आज जिल्हाधिका:यांनी मार्केटची पाहणी केली व हा निर्णय घेतला. तर 19 जुलैनंतरही टाळे कायमगाळेधारकांना स्वच्छतेसाठी चार दिवसांची (19 जुलैर्पयत) मुदत देण्यात आली आहे. या चार दिवसानंतर मार्केटची पाहणी करण्यात येणार असून समाधानकारकस्थिती आढळून न आल्यास हे आदेश 19 जुलैनंतरही कायम राहतील, असे आदेशात म्हटले आहे.मनपा व गाळेधारकांची स्वच्छतेची जबाबदारीबंदच्या आदेशाबाबत प्रांताधिकारी जलज शर्मा म्हणाले की, गोलाणी मार्केटमधील स्वच्छतेची जबाबदारी ही मनपा व मार्केटमधील सर्वाची आहे. मार्केटमधील सर्वानी कुंडीतच कचरा टाकला पाहिजे व मनपाने तो वेळोवेळी उचलणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. गोलाणी मार्केट रविवार पासून बंद राहणार असल्याचे आदेश पारीत होताच शनिवारी संध्याकाळी गोलाणी मार्केटमध्ये प्रचंड खळबळ उडाली. अनेक व्यापारी, गाळेधारक व रहिवासी मार्केटमध्ये एकत्र आले व निर्णयावर चर्चा करीत होते. प्रांताधिका:यांनी केली होती पाहणीशरद काळे यांच्या तक्रारीनंतर प्रांताधिकारी शर्मा यांनी मे महिन्यात प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथे कचरा साचण्यासह सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने दरुगधी पसरल्याचे आढळून आले होते. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने 8 जून 2017 र्पयत सर्व शासकीय विभाग व यंत्रणा प्रमुख यांना उपाययोजनाबाबत आदेश देण्यात आले होते. आदेशानंतरही मनपाने स्वच्छता न केल्याचा ठपकास्वच्छतेच्या आदेशानंतर मनपाने 9 जून रोजी कार्यवाही केल्याचा अहवाल सादर केला मात्र 15 जुलै रोजी पुन्हा प्रांताधिकारी शर्मा यांनी पाहणी केली असता स्वच्छता न होता परिस्थिती जैसे थे असल्याचा ठपका शनिवारी काढलेल्या आदेशात ठेवण्यात आला आहे. कलम 133 नुसार गोलाणी मार्केट बंदचे आदेशजिल्हाधिका:यांनीही शनिवारी सकाळी पाहणी केली असता अस्वच्छता आढळून आल्याने व त्यामुळे आरोग्य धोक्यात येत असल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 133 नुसार 24 मे 2017 रोजीचा अंतरिम आदेश कायम करीत असल्याचे नमूद करीत 19 जुलै र्पयत गोलाणी मार्केट बंद ठेवण्याचे आदेश पारित केले.