ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 14- 18 वर्षापुढील मतिमंदांचे जगणे सुसह्य व्हावे व पालकांनाही या मुलांचे ओङो होऊ नये यासाठी केशवस्मृती सेवा संस्थेने मतिमदांना आजन्म आधार मिळावा यासाठी ‘आश्रय माङो घर’ हा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. सध्या या घरात 12 मतिमंदांना आजन्म आश्रय मिळाला आहे. मतिमंदांच्या पालकांचे प्रश्न खूप अवघड असतात. अशा पालकांसाठी रोजचे जीवन म्हणजे रणांगण. रोज नवे मैदान, रोज नवी लढाई असते. आई-बाबा झाल्यावर आनंदात असणा:या पालकांना जेव्हा ते बालक विशेष मूल (मतिमंद) आहे, हे समजते, तेव्हा त्यांना धक्का बसतो. मुलांसाठी वेगळी शाळा शोधणे, त्याचे संगोपन आणि प्रौढावस्थेनंतरचे अनेक प्रश्न सतावतात. मुलांमध्ये वाढत जाणारी आक्रमक शक्ती आणि दुसरीकडे पालकांची उतारवयाकडे वाटचाल. त्यामुळे पालकांना अशा मुलांना सांभाळणे जिकीरीचे जाते. ही गैरसोय दूर करण्यासाठी केशवस्मृती सेवा संस्थेने 18 वर्षापासून पुढे मतिमंद मुलांचा आजीवन सांभाळ करण्याचा वर्षभरापूर्वी निर्णय घेतला आहे. त्यासाठी आश्रय माङो घर हा प्रकल्प सुरु केला असून 3 डिसेंबर रोजी या प्रकल्पाला वर्ष पूर्ण झाले. सध्या या आश्रय घरात 12 मतिमंदांना आधार मिळाला आहे. त्यात 18 वर्षापासून तर वयाच्या 65 वर्षार्पयतचे मतिमंद आहेत. मुंबई, पुणे व नाशिक या मोठय़ा शहरांमध्ये 18 वर्षाच्या पुढील मतिमंदांसाठी हा प्रकल्प आहे मात्र खान्देशात असा प्रकल्प नव्हता. त्यामुळे मतिमंद मुलांच्या पालकांची सोय झाली आहे. ‘आश्रय माङो घर’मध्ये मतिमंदांसाठी एक वर्कशॉप विकसीत केला आहे. ज्यात या मुलांच्या आक्रमक शक्तीला वळण देण्याचा प्रय} केला जातो. त्यात ते नवनवीन वस्तू तयार करण्यात मगA असतात. जी मुले घरी आक्रमक होती ती सुद्धा अगदी आनंदाने संपूर्ण दिनचर्येत व्यस्त असतात. विविध वस्तू बनवून त्यांना रोजगारही मिळू लागला आहे. रोजगाराची ही रक्कम त्यांच्यावरच खर्च केली जाते. मतिमंदांच्या पालकांसाठी 17 रोजी मार्गदर्शन18 वर्षाच्या पुढील मतिमंदांसाठीच्या ‘आश्रय’बाबत जनतेला माहिती मिळावी, यासाठी केशवस्मृती सेवा संस्थेतर्फे 17 डिसेंबर रोजी कांताई सभागृहात मतिमंदांवरील ‘कच्चा लिंबू’ हा मराठी चित्रपट दाखविण्यात येणार असून या चित्रपटाचे निर्माते मंदार देवस्थळी हे मार्गदर्शन करणार आहेत. याचवेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बदलापूर येथील आधार संस्थेचे संचालक विश्वास गोरे हे मार्गदर्शन करणार आहेत.‘आश्रय-माङो घर’ हे शहरापासून काही अंतरावर असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमाच्या आवारात आहे. वर्षभरातच मुलांचे ‘आश्रय’वरील प्रेम घट्ट झाले आहे. दिवाळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमध्ये आई-बाबा त्यांना घ्यायला आले असता, ही मुले घरी जाण्यास नकार देतात, हेच ‘आश्रय’चे यश आहे.-अमित पाठक, सचिव, आश्रय माङो घर