कजगाव ता. भडगाव (जि. जळगाव), दि. 10 : सुमारे 200 वर्षापूर्वी भाईकनशा फकीर बाबा यांनी सुरु केलेली कुवारी पंगतीची प्रथा कजगावकर आजही मोठय़ा श्रद्धेने जोपासत आहे. श्रावण महिन्यात गुरुवारी पंगतीचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे 10 रोजी पंगतीचे आयोजन केले होते. यावेळी शेकडो बालकांनी गोड भाताचा आस्वाद घेतला.जवळपास पाच क्विंटलचा गोड भात पंगतीसाठी बनविला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महेंद्रसिंग पाटील, शांतीलाल जैन, स्वप्नील पाटील, हिरालाल पवार, पंढरीनाथ बोरसे, दिनेश पाटील यांचे हस्ते दग्र्यावर चादर चढविण्यात आली. यानंतर कुवारी पंगतीस सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश जैन, प्रमोद पवार, अरुण पाटील, एकनाथ पाटील, बंडू पाटील, राजू चौधरी, निलेश पवार, योगेश पाटील, हिरालाल पाटील, रहेमान शेख, प्रकाश न्याती, संभाजी महाजन, राजेंद्र पाटील, रोहित पाटील, भैया महाजन, सचिन महाजन, भैया पाटील, समाधान पाटील, संजय पाटील आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. .. अशी सुरु झाली प्रथाया प्रथेबाबत माहिती अशी की, फार जुन्या काळात येथील गढीमध्ये बुरुज बनवून एक फकीर बाबा आपल्या रखवालदारासह राहू लागला होता. एकदा परिसरात दुष्काळ सदृष्य परीस्थिती निर्माण झाली होती. चिंताग्रस्त गावकरी भाईकनशा फकीर बाबाच्या बुरुजा जवळ जमलेव आपली व्यथा मांडली. बाबांनी यावेळी गावक:यांना सांगितले की, संपूर्ण गावातुन यथाशक्ती गाव वर्गणी रोख स्वरूपात किंवा अन्न धान्य स्वरूपात गोळा करा आणि संपूर्ण गावात कुवा:या बालकांना गोड भाताची पंगत द्या. बाबाच्या आदेशानुसार गावक:यांनी गाव वर्गणी गोळा केली आणि तो श्रावण महिनाच होता. गुरुवारी कुवारी पंगतीचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण गावातील कुवा:या बालकांनी गोड भाताचा आस्वाद घेतला. कुवारी पंगतीचा कार्यक्रम आटोपला आणि काही वेळातच मेघराजा जोरदार बरसला. संपूर्ण गावात आनंद उसत्व साजरा झाला दुष्काळी परिस्थिती बदलली सर्वत्र शिवार फुलल आणि पुन्हा सारे गावकरी बाबांजवळ जमले सारेच बाबांच्या चरणी नतमस्तक झाले. तेव्हा पासून गावक:यांनी कुवारी पंगतीची प्रथा कायम सुरू ठेवली आह.े दमदार पाऊस झाला तरी किंवा पावसाने दडी मारली तरी कुवारी पंगतीचे आयोजन दरवर्षी केले जाते. ..आणि बाबांनी समाधी घेतलीज्या बाबांनी कजगावात कुवारी पंगतीची प्रथा घालून दिली त्या भाईकनशा फकीर बाबांनी आपल्या वृद्धापकाळात तितुर नदीच्या काठी घनदाट अरण्यात जिवंत समाधी घेतली. ते समाधी स्थळ आज हिंदू -मुस्लीमांचे देवस्थान बनले आहे. दर वर्षी पोळ्याच्या दुस:या दिवशी बाबांच्या नावाचा उरूस भरविण्यात येतो, कुस्त्याची दंगल, तमाशा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. उरूस च्या दिवशी समाधी स्थळाचे हिंदू- मुस्लीम दर्शन घेतात.
कजगाव येथे कुवारी पंगत उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 6:11 PM
200 वर्षाची परंपरा
ठळक मुद्देश्रावण महिन्यात गुरुवारी पंगतीचे आयोजन करण्यात येते.