खडकदेवळा : पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील हिवरा माध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या प्रकल्पाच्या उगमस्थानी डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. या हिवरा माध्यम प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाला असून पाणी ओसंडून वाहत आहे.
हिवरा माध्यम प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाल्याने परिसरातील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. अनेक ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा हा याच प्रकल्पाच्या जलसाठ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हिवरा माध्यम प्रकल्प १०० टक्के भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. तसेच हिवरा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
खडकदेवळा हिवरा माध्यम प्रकल्प बनला धोकादायक
खडकदेवळा येथील प्रसिध्द असलेल्या हिवरा माध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीच्या पाइपची चोरी झाली आहे. त्यामुळे हिवरा माध्यम प्रकल्पाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय झाली आहे. अनेकांना सेल्फी घेण्याचा मोह होतो. त्यामुळे या ठिकाणी संरक्षण भिंतीच्या पाइपची चोरी झाल्याने या ठिकाणी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सध्याच्या परिस्थितीत हिवरा माध्यम प्रकल्पाच्या उगमस्थानी डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने प्रकल्पाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन प्रकल्प १०० टक्के जलसाठा झाला असून पाणी ओसंडून वाहत आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे प्रकल्पाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.