शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

मुक्ताईनगर येथील खडसे आश्रमशाळा गैरव्यवहारातील आरोपीस अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:59 AM

माजी कर्मचाऱ्याची मागणी

ठळक मुद्देराजकीय दबावापुढे पोलीस हतबलखडसेंना वेगळा न्याय व मला वेगळा न्याय

जळगाव : मुक्ताईनगर येथील गणपतराव खडसे अनुदानित आश्रम शाळेतील गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीला तत्काळ अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करावे अशी मागणी या शाळेतील माजी कर्मचारी नरेंद्र तायडे यांनी पत्रकार परिषदेत केली.सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजता जळगाव शहरातील बळीराम पेठेतील ओक मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.गणपतराव खडसे अनुदानित आश्रम शाळेतील संशयित आरोपी व मुख्याध्यापक राजेश पाटील यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय अनुदानात एक लाख ७५ हजार ३६४ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्याचा दावा त्यांनी केला. राजकीय दबावामुळे हा गुन्हा दाखल न झाल्याने २ डिसेंबर २०१५ रोजी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात कलम १५६ (३) नुसार गुन्हा दाखल आहे. तसेच आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी या आश्रमशाळेतील मुख्याध्यापकास अफरातफर केल्याप्रकरणी दोषी ठरविले आहे. मात्र माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यामुळे मुक्ताईनगर प्रशासनाने तब्बल १७ महिने उलटलनंतरही आरोपीस अटक केलेली नाही. या प्रकरणात दोषारोपपत्र देखील दाखल केलेले नाही.या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी निलोत्पल यांच्याकडे वर्ग करण्यात आला. मात्र त्यांनी आरोपीस अटक करण्याऐवजी भुसावळ कोर्टात रिव्हीजन अपील दाखल करीत या प्रकरणात स्थगिती मिळवून घेतल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस प्रशासन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या दबावापोटी आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस प्रशासन राजकीय दबावापोटी कारवाई करीत नसेल तर माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने न्यायाची अपेक्षा कुणाकडून करावी असा सवालही त्यांनी केला.खडसेंना वेगळा न्याय व मला वेगळा न्यायमाजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व अन्य ५ जणांविरूद्ध मुक्ताईनगर न्यायालयात खटला दाखल केला. या प्रकरणी १२ जून रोजी गुन्हा दाखल झाला. आठ दिवसात पोलिसांनी या प्रकरणातील काही जणांना अटक केली. मात्र खडसे आश्रम शाळेतील भ्रष्टाचार प्रकरणात १७ महिन्यानंतरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे खडसे यांना वेगळा व मला वेगळा न्याय असे का? असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव