जळगाव : राज्याचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे हे भाजपामधील भुजबळ आहेत. त्यांचा जिल्ह्यात दबाव असतो. पण मी त्यांच्या जमिनी, संस्था यांची माहिती घेऊन ती जनतेसमोर आणणार. ही तर सुरुवात आहे, असे सामाजिक कार्यकत्र्या अंजली दमानिया यांनी बुधवारी जळगावात पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.
दमानिया दुपारी 4.45 वाजता शहरात दाखल झाल्या. महसूलमंत्री खडसे यांच्या जावयाच्या लिमोझीन कार व कंत्राटांसंबंधीचे आरोप करून दमानिया यांनी खळबळ उडवून दिली आहे. अशातच त्या शहरात आल्याने राजकीय गप्पांना ऊत आला. दमानिया यांनी तापी पाटबंधारे महामंडळांतर्गत असलेल्या जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाकडून पद्मालय 2, लोअर तापी प्रकल्पाच्या गेटचे काम, तापी नदीवरील तीन पुलांचे बांधकाम आणि महसूलमंत्र्यांच्या मतदारसंघातील कु:हा वढोदा उपसा योजनेची सविस्तर माहिती मागितली. ती पुरविण्यासाठी अधिका:यांमध्ये एकच धावपळ सुरू झाली. ही माहिती मिळावी यासाठी दमानिया पाटबंधारे विभागाच्या गिरणा या कार्यालयात रात्रीर्पयत बसून होत्या. त्यांच्यासोबत आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक डॉ.सुनील गाजरे होते.