लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमचे विचार सारखेच आहेत. त्यामुळे ते राष्टÑवादी काँग्रेसमध्ये येऊ शकतात. खडसेंना विठोबा पावला अशा चर्चा रंगत आहे मात्र तशी परिस्थिती नाही, असा दावा ‘राष्टÑवादी’चे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी बुधवारी आयोजित पक्षाच्या बैठकीत केला. राष्टÑवादी कॉँग्रेसचा जिल्हा मेळावा १३ जुलै रोजी पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी आमदार अरुण पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश अध्यक्ष गफ्फार मलीक, विकास पवार, युवक अध्यक्ष योगेश देसले, वाल्मीक पाटील, शीतल साळी, नामदेव चौधरी, कल्पना पाटील, मंगला पाटील, मिनल पाटील, कल्पिता पाटील, नगरसेविका लता बारी यांच्यासह जिल्हाभरातून पदाधिकारी उपस्थित होते. ते क्रेडीट कुणाचे-अरुणभाई गुजराथीशरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतरच कर्जमाफीचा निर्णय या सरकारने घेतला. मग कर्ज माफीचे ‘क्रेडीट’ कुणाचे असा सवाल माजी मंत्री अरुणभाई गुजराथी यांनी केला. कृषि क्षेत्रासाठी राज्याचे स्वतंत्र बजेट असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनीही मनोगत व्यक्त करून १३ रोजी आयोजित मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले. सरपंचपद पक्ष चिन्हावरआगामी ग्रां.प. निवडणुकांमध्ये पक्षाच्या चिन्हावर सरपंचपदाचा उमेदवार देण्याचा ठरावही या बैठकीत करण्यात आला. अनेक सेलचे पदाधिकारी केवळ ‘लेटर पॅड’ पर्यंत मर्यादीतराष्टÑवादी कॉँग्रेसच्या अनेक सेलचे पदाधिकारी सक्रीय नाहीत. पद केवळ लेटर पॅड छापण्यापर्यंत मर्यादित नसून आगामी काळात कामे करावी करावे लागणार आहेत. महिला जिल्हाध्यक्षांसह विविध पदे १३ रोजी चर्चा करून त्याच दिवशी अध्यक्षांची नावे घोषित केली जातील, असे डॉ.सतीश पाटील यांनी सांगितले.
खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊ शकतात - डॉ.सतीश पाटील
By admin | Published: July 06, 2017 12:10 AM