मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी आमदार एकनाथराव खडसे यांनी मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास मुहूर्तावर अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे गेल्या २५ वर्षांपासून पक्षातील उमेदवार ठरवण्याचे काम करणारे आमदार एकनाथराव खडसे यांच्या उमेदवारी अजार्सोबत आज ए - बी फॉर्म नव्हता. खडसे यांची उमेदवारी अर्ज दाखल करताना सूचक म्हणून भाजप तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, बोदवड तालुकाध्यक्ष भागवत टीकारे, शिवाजी पाटील, श्रीकांत महाजन सूचक म्हणून उपस्थित होते. जोरदार शक्ती प्रदर्शन करून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करून बाहेर पडलेले आमदार खडसे यांचे नाव भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत तुमचे नाव नसल्याचे विचारण्यात आले असता आज मुहूर्तावर अर्ज भरला पक्षाने उमेदवारी जाहीर केलेल्या यादीत माझं नाव आहे की नाही मला ठाऊक नाही. पक्षाचे काम इमाने इतबारे केले आहे. अनेक प्रलोभने आली, पण कधी पक्ष सोडला नाही. पुढच्या यादीची प्रतीक्षा करूया, असं सांगत कालाय तस्मै नम: अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.खडसे यांच्या उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म नसल्याचे वृत्त वाºयासारखे पसरले. खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून येथे आयोजित शक्तिप्रदर्शन स्थळे ते निघून गेले.
खडसेंनी उमेदवारी दाखल केली मात्र ए बी फार्म नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 3:42 PM