जि़ प़ निवडणुकीत नाराजी व्यक्त : भोकरदनला घेतली भेट
भुसावळ, दि.3- माजी मंत्री एकनाथराव खडसे व भाजपा मंत्री जिल्हाध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भोकरदन येथे भेट घेतली. भेटीत झालेली गुप्तगु उघड झाली नसली तरी जि.प.सभापती निवडीत निष्ठावंताना डावलणे, सक्रिय काम करणा:यांना पदांऐवजी फक्त प्रतीक्षा नशिबी येणे यासह जिल्हाभरातील भाजप कार्यकत्र्याचा सूर प्रदेशाध्यक्षांसमोर मांडण्यात आल्याचे समजत़े
प्रामुख्याने जामनेर येथील निष्ठावंतांना डावलून सेवानिवृत्त अधिका:यांच्या पत्नीला सभापती पदामुळे जामनेर येथील कार्यकत्र्याची खदखद, शिवसेनेतून भाजपात आलेले प्रभाकर सोनवणे यांची सभपपदीपदी वर्णी, सभापती निवडीत सामाजिक समतोल न राखला जाणे यासह सुरूवातीपासून काँग्रेसचे आर.जी.पाटील यांनी भाजपाला समर्थन दिले होते त्यांना सभापती करण्याबाबत खुद्द मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी आश्वासन दिले होते असे असताना ही त्यांना पद न देणे आणि नेमके याच विषयावरुन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यात खडाजंगी होण्याचे वृत्त समोर आले होते. यासर्व बाबी प्रदेशाध्यक्षासमोर मांडण्यात आल्याचा माहिती सूत्रांकडून मिळाली. तर जिल्ह्यात सुंदोपसुंदीमुळे भाजप कार्यकत्र्यामधील अस्वस्थता मांडली गेल्याचे समजते.
दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ही केवळ सदिच्छा भेट होती, असे सांगत प्रदेशाध्यक्षाची सदिच्छा भेट घ्यायची नाही का? असा सवाल केला.
अशोक कांडेलकर यांनीदेखील ही औपचारीक भेट होती. खडसे साहेबांसोबत आम्ही गेले होतो. प्रदेशाध्यक्ष व खडसे साहेबांचे काय चर्चा झाली याबाबत आपणास माहिती नाही, असे ते म्हणाल़े (वार्ताहर)