मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : ‘नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लवकरच येणार असल्याचे सांगून दोन दिवसाअगोदर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यावर शरसंधान साधणारे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी आपल्या वाढदिवसानिमित्ताने ‘मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल’ हे महाराष्ट्रातील जनतेला आवडले की नाही याचा शोध घेणार असल्याचे सांगत फडणविसांवर पुन्हा टीकेचा बाण सोडला आहे.पक्ष व पक्षाबाहेरील कार्यकर्त्यांमध्ये माझ्यावर झालेल्या अन्यायाचा संताप आहे. दर वेळेस ते संताप व्यक्त करतात आणि मी त्यांना शांत करतो. आता त्याचा कधी स्फोट होईल सांगता येणार नाही, असे सांगून कोरोना संकट काळ दूर झाल्यावर राज्यभरात दौरा करून घडामोडी घडविणार असल्याचा इशारा देत ‘टायगर अभी जिंदा है’ असे सूचक वक्तव्य एकनाथराव खडसे यांनी केले.एकनाथराव खडसे यांचा बुधवारी ६८व्या वाढदिवसानिमित्त ‘जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचे प्रकाशन होते. परंतु माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे पुस्तक प्रकाशन १० सप्टेंबर रोजी होणार आहे, तर खडसेंनी सांगितल्यानुसार पुणे येथील लेखकाचे ‘नाना फसाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लवकरच येणार असल्याचे सांगून दोन्ही पुस्तकाबाबत त्यांनी उत्सुकता वाढविली.भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांसोबत अनौपचारिक चर्चेत बोलताना खडसे म्हणाले, पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. पक्ष वाढविण्यासाठी आम्ही खस्ता खाल्ल्या. जीवाचे रान केले आणि आता उलटेच झाले. ज्यांना घडविले ते नेते काय झाले आणि आम्हाला आता अक्कल शिकवताय? प्रमोद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा आम्ही सर्व नेत्यांनी राज्य पिंजून काढत पक्षाची उभारणी केली, नव्हे तर प्रतिकूल परिस्थितीत सत्ताही आणली होती. अगदी २०१४ मध्ये युती नसतानाही एक हाती सत्ता राज्यात आणली होती. यंदा अनुकूल वातावरण होते. केंद्रात आपलं सरकार होतं, राज्यातही होतं, तरी पक्षाला सत्ता गमवावी लागली. ‘मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार...’ हे राज्यातील जनतेला आवडलं की नाही. याचा आता मी शोध घेणार आहे. तर हा अहंकार पक्षातही अनेकांना रुचला नाहीये, असे बोलत पक्षातही आलबेल नसल्याचा सूचक इशारा त्यांनी केला.राज्यात आमदार फोडून सत्ता शक्य नाही तर आघाडी सरकार सध्या तरी भक्कम आहे, असेही त्यांनी सांगितले.आज दिवसभर मोठ्या संख्येने जिल्ह्यासह विदर्भातील कार्यकर्ते एकनाथराव खडसे यांना शुभेच्छा देण्यास त्यांच्या फार्म हाऊसवर गर्दी केली होती, तर राज्यातील काही प्रमुख नेत्यांनी फोन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. काही कार्यकर्त्यांनी शांतीपाठ व महामृत्युंजय जपही केले.
‘टायगर अभी जिंदा है...’ म्हणत खडसेंचे फडणविसांवर टीकेचे बाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 6:15 PM
कोरोना संकट काळ दूर झाल्यावर राज्यभरात दौरा करून घडामोडी घडविणार असल्याचा इशारा देत ‘टायगर अभी जिंदा है’ असे सूचक वक्तव्य एकनाथराव खडसे यांनी केले.
ठळक मुद्दे‘मी पुन्हा येणार...’ हे जनतेला आवडलं की नाही, याचा शोध घेणारअहंकार पक्षातही अनेकांना रुचला नाहीआघाडी सरकार सध्या तरी भक्कमभाजपमध्येही आलबेल नसल्याचा सूचक इशाराआता पुस्तक प्रकाशन समारंभ १० रोजी होणार