जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर झालेल्या कारवाईमागे कोणत्या मंत्र्याचा हात आहे, याची माहिती यांनी थेट मुख्यमंत्र्यांना द्यावी, मात्र पत्रकारांना ही माहिती देणे भाजपाची संस्कृती नाही, असे मत राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.अंजली दमानिया यांच्याकडून आपली बदनामी करणे व आपल्यावर कारवाई होणे यामागे भाजपाच्याच एका मंत्र्याचा हात असल्याचे विधान खडसे यांनी केले होते. त्याबाबत पालकमंत्री पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, खडसे हे मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी अधिक काय बोलणार? पण त्यांनी ‘त्या’ मंत्र्याचे नाव थेट मुख्यमंत्र्यांना सांगावे.मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे, मात्र त्यांचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. आज मुख्यमंत्री विदेशातून परत येतील त्यानंतर दोन दिवसांनी याबाबतचा निर्णय ते जाहीर करतील.सध्या कृषीविभाग आपल्याकडेमी प्रभारी मुख्यमंत्री नसून मंत्रीगटाच्या समितीचा सदस्य आहे. मुख्यमंत्री जास्त दिवस परदेश दौऱ्यावर गेल्याने तातडीने निर्णय घेण्यासाठी कोणावर तरी जबाबदारी सोपवितात. त्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व मी अशा तीन जणांच्या मंत्रीगटाची समिती नियुक्त केली आहे. परंतु, आता सध्या कृषी विभागाचा पूर्ण कारभार आपल्याकडेच असून नवीन मंत्री नियुक्त होईपर्यंत हा कारभार आपल्याकडेच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.वाकडी प्रकरणाला नाहक दिला जातोय जातीय रंगवाकडी येथील विहिरीत पोहताना मुलांना मारहाण करण्यात येवून त्यांची धिंड काढण्यात आली याप्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या प्रकरणाला नाहक जातीयतेचा रंग दिला जात आहे. प्रत्येक घटनेकडे एकाच दृष्टीकोणातून पाहणे बरोबर नाही. काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहूल गांंधी यांनीही या प्रकरणाचे राजकारण सुरु केले आहे. जे झाले ते अत्यंत चुकीचे आहे. अपूर्ण माहितीच्या आधारे जातीयवाद निर्माण केला जात आहे. ते कृत्य विकृत असून दोषींना शिक्षा झालीच पाहिजे यात दुमत नाही. तसेच पोलीसही त्यांचे काम करीत आहे. योग्य कारवाई सुरु आहे. त्या गावात विनाकरण गर्दी करुन त्या गावाचे नाव खराब करणे योग्य नाही, असेही पालकमंत्री म्हणाले.
‘त्या’ मंत्र्याचे नाव खडसे यांनी थेट मुख्यमंत्र्याना द्यावे : महसूलमंत्री चंद्रकात पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 8:52 PM
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर झालेल्या कारवाईमागे कोणत्या मंत्र्याचा हात आहे, याची माहिती यांनी थेट मुख्यमंत्र्यांना द्यावी, मात्र पत्रकारांना ही माहिती देणे भाजपाची संस्कृती नाही, असे मत राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ठळक मुद्देपत्रकारांना माहिती दिल्याबद्दल व्यक्त केले मतखडसे मोठे नेते, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार?मंत्रीमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्र्याचावाकडी प्रकरणाला नाहक दिला जातोय जातीय रंग