मतीन शेखमुक्ताईनगर : दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील खामखेडा गावात म्हशींना घटसर्पाची लागण लागली असून, आठवड्या भरात ७ म्हशी दगावलेल्या आहेत. यामुळे पशुधन मालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.येथे गेल्या आठवडाभरापूर्वी एका म्हशीचे अचानक डोळे लाल पडले आणि दुसऱ्याच दिवशी म्हैस दगावली. अशाच प्रकारे तिसऱ्या व चौथ्या दिवशी दररोज एक म्हैस दगावण्याचे सत्र सलग सात दिवसांपासून सुरू आहे. सात म्हशी दगावल्यायात कैलास सुकदेव पाटील यांच्या दोन, प्रवीण प्रकाश गवते यांच्या दोन, सुनील शालिक गावळे व रामचंद्र त्र्यंबक गवते यांची प्रत्येकी एक, तर अन्य एक अशा सात म्हशी दगावल्या. दररोज एक म्हैस दगावत असल्याने दुग्ध उत्पादक शेतकरी भयभीत झाले आहेत.अचानक म्हशी दगावल्याने गावातील इतर म्हशी पशुधन मालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तब्बल६० ते ९० हजारांच्या किमतीच्या या म्हशी डोळ्यादेखत जात असल्याने आर्थिक नुकसानीपाठोपाठ जीव लावलेले पशुधन गमविण्याचे दुःख तर इतरांना आपल्या म्हशींची काळजी अशी स्थिती येथे निर्माण झाली.गावात ४९५ म्हशीघरात बायको नसली तर चालेल, मात्र दाराशी म्हशी पाहिजेच, असा प्रघात असलेल्या खामखेडा गावात म्हशींवर साथीच्या आजाराचे सावट पसरले आहे. अडीच हजार लोकसंख्येच्या या गावात ४९५ म्हशी आहेत. म्हशींवर आलेल्या संसर्गजन्य आजारामुळे पशुधन मालक भीतीच्या सावटात आहे.घटसर्पाचा प्राथमिक निष्कर्षसोमवारी दगावलेल्या एका म्हशीचे माजी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. एस.वाय.नारखेडे यांनी शवविच्छेदन केले. यात म्हशींचे मृत्यू घटसर्प आजारामुळे अंतर्गत रक्तस्त्रावामुळे होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष डॉक्टरांनी दिला व तातळीन म्हशींना घटसर्पाच्या लसीकरण करण्याचे सुचविले.
खामखेडा येथे म्हशींचा मृत्यू हा घटसर्प आजारामुळे होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. येथे म्हशींना लसीकरण करण्याची उपाययोजना आरंभली आहे. -डॉ अभय डुघरेकर, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, मुक्ताईनगर