चोपडा : लघु कृषक व्यापार संघ, कृषि मंत्रालय, दिल्ली यांच्या वतीने महाफार्मर हाऊस प्रोड्युसर गट व जळगाव खान्देश शेतकरी उत्पादक कंपनी चोपडा हे आता यापुढे तुरीची खरेदी करणार असल्याची माहिती शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष एस.बी.पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.येथील शेतकरी कृती समितीच्या कार्यालयात सायंकाळी पत्रकार परिषद झाली. शेतकºयांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकरी कृती समिती पुरस्कृत जळगाव खान्देश शेतकरी उत्पादक कपंनी, भारत सरकारच्या लघु कृषक कृषी व्यापारी संघ व महाफार्मर प्रोड्यूसर गट यांच्या संयुक्त सहकार्याने शासनासाठी तूर खरेदी करणार आहे. येत्या आठवड्यात बारदान उपलब्ध झाल्याबरोबर शासकीय हमी भाव ५०५० रुपये प्रती क्विंटल एवढा हमी भाव दिला जाईल. बाजार समितीतील वखार महामंडळाच्या गोदामाजवळच केंद्र सुरू होणार आहे. शेतकºयांनी सातबारा उतारा, ८ अ चा उतारा, बँकेचे पासबुकची झेरॉक्स व आधारकार्डाची झेरॉक्स सोबत आणणे बंधनकारक आहे.पत्रकार परिषदेला यावेळी चेअरमन डॉ.रवींद्र निकम, उपाध्यक्ष भागवत महाजन, उदय पाटील, डॉ.सुभाष देसाई, वसंत पाटील, मेहमूद बागवान, अॅड.एस.डी.सोनवणे, अॅड. हेमचन्द्र पाटील, प्रफ्फुल्ल पाटील, नारायण पाटील, अजित पाटील, धनंजय पाटील, जितेंद्र पाटील, कुलदीप राजपूत, अॅड.व्ही.डी.जोशी, आरीफ शेख आणि इतर शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)टिश्यूची लाखभर रोपेही पुरविली४शेतकरी कृती समितीने जळगाव खान्देश शेतकरी उत्पादक लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत गेल्या दोन महिन्यात एक लाख टिश्यू कल्चरचे केळी रोपे पुरवली आहेत. दोन लाख केळी रोपांवर निर्यातीसाठीची प्रक्रिया सुरु केली आहे.
खान्देश शेतकरी उत्पादक गट तुरीची खरेदी करणार
By admin | Published: January 19, 2017 12:21 AM