प्रसाद धर्माधिकारीनशिराबाद- खान्देशवासीयांचे कुलआराध्य दैवत असलेला ‘कानबाई उत्सव’ अर्थात ‘रोट’ १९ आॅगस्ट रविवारी साजरा होत आहे. नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारीच हा उत्सव साजरा होत आहे. बाहेरगावी असलेले भाऊबंध या व्रताला एकत्र येतात व हा उत्सव साजरा करतात. म्हणून या उत्सवाला ‘भावबंधनाचा महिमा’ वर्णन करणारा एकात्मतेचे दर्शन घडविणारा उत्सव असेही संबोधले जाते.खान्देशात कानबाई उत्सवाला अनन्य महत्व आहे. कानबाई ही श्रीफळ म्हणून मानल्या जाणाºया नारळाच्या रुपाने घरोघरी स्थापना केला जाते. कुलपरंपरेनुसार घरपरत्वे उत्सव साजरा केला जातो. कुलाचाराप्रमाणे सकाळी आदित्य उगतभानु (सूर्यनारायण), सायंकाळी कानबाई रोट साजरे करतात.रोटासाठी आदल्यादिवशीच गहू कुलाचाराप्रमाणे मोजून दळून घेतले जाते. या कणकेला गव्हाच्या पीठास रोट असे म्हणतात. ईष्टदेवतांसह घरातील कुटुंबिय सदस्यांची संख्या अशी प्रत्येकाची पाचमुठ गहू दळणासाठी घेतात. कुलाचाराप्रमाणे प्रत्येक ठिकाणी पद्धत निरनिराळी आहे. ही रोटाची कणीक देवीच्या कुळधर्मापूर्वी अर्थात् पौर्णिमेच्या आत संपवायची असते. अशी प्रथा आहे.अशी करतात स्थापनाकेळीचा खांबाने मखर सुशोभित करुन चौरंगावर तांब्याच्या कलशात सुपारी, पैसा (नाणे) टाकून व सजवून त्यावर पारंपारिक नारळ ठेवून देवीचा शृंगार करावा. अलंकारांनी सजवून देवीला प्रिय असलेली फुले अर्पण करावी. दुपारी विधीवत स्थापना करुन सायंकाळी महानैवेद्य अर्पण करावा. रोट (पोळी), गंगाफळाची भाजी विनातिखटाची, खीर, असा नैवेद्य कानबाई अर्पण केला जातो. साखर फुटाणे, लाह्या, काकडीच्या प्रसादाला महत्व आहे. महाआरती करुन सायंकाळी भाऊबंध एकत्र प्रसाद ग्रहण करतात. रात्री झिम्मा, फुगड्या, जागरण, गीतभजनाचा कार्यक्रम होतात.उद्या विसर्जनस्थापन पूजन झाल्यानंतर दुसºया दिवशी म्हणजे सोमवारी विसर्जन केले जाईल. दही-भाताचा नैवेद्य अर्पण करुन विधीवत पूजनाने विसर्जन करण्यात येते. अनेक ठिकाणी नदीपर्यंत मिरवणूका काढून व कानबाईचे विसर्जन केले जाते. घरपरत्वे कुलाचार व कानबाई रोट उत्सवाची परंपरा थोड्या प्रमाणात निरनिराळी आढळून येते.
खान्देशचा कुलदैवत उद्या कानबाई उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 8:00 PM
खान्देशवासीयांचे कुलआराध्य दैवत असलेला ‘कानबाई उत्सव’ अर्थात ‘रोट’ १९ आॅगस्ट रविवारी साजरा होत आहे.
ठळक मुद्देकानबाई उत्सवाची तयारी पूर्णत्वासभावबंधनाचा महिमाएकात्मतेचे दर्शन घडविणारा उत्सव