शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

खान्देशातील गुणवंतांचा मांडळ येथे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2021 4:20 PM

यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्यांचा सन्मान करण्यात आला.

संजय पाटीलअमळनेर : यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेले   अधिकारी यांचा मांडळ ग्रामस्थांकडून कर्तृत्वाचा गौरव सोहळा मांडळ येथे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला.यावेळी यूपीएससी परीक्षेत १८२ रँक मिळवणारे गौरव साळुंके, ४८४ रँक मिळवणाऱ्या दृष्टी जैन व एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या उपजिल्हाधिकारी मानसी पाटील यांच्यासह त्यांच्या पालकांचा सत्कार आमदार अनिल पाटील व शिंदखेडा येथील माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच गौरव साळुंके यांचा सत्कार सरपंच  विद्या पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.मानसी पाटील यांचा सत्कार माजी सरपंच रंजना जितेंद्र पाटील यांच्या हस्ते झाला.ओडिशा राज्यात संबलपूरचे जिल्हाधिकारी मयूर सुर्यवंशी हेदेखील डॉ.दीपक पाटील यांचे भाचे असल्याने त्यांच्या आईवडिलांचादेखील सत्कार करण्यात आला. तसेच गावातील सर्व क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्याचा सत्कार  करण्यात आला.प्रास्ताविक डॉ. दीपक पाटील यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी मानसी पाटील म्हणाल्या की, मला शिक्षणाची प्रेरणा मांडळ येथील डॉ. सुनील चोरडिया यांच्यामुळेच मिळाली. मांडळ हे गाव कायम लोकांना सहकार्य करणारे गाव आहे. आमचे यश जरी छोटे असले तरी आमचे घाव मात्र कोणाला दिसत नाहीत.गौरव साळुंके यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, माझं आणि मांडळचे नाते खुप जवळचे आहे. मांडळ हे गाव माझ्या मामाचे गाव आहे. मला वाचनाचे संस्कार माझ्या आईकडून मिळाले. यश हे सहज शक्य होत नाही. त्यासाठी खुप मेहनत करावी लागते. आयएएस होणे हे खूप मोठं नाही परंतु समाजासाठी काही करायचे आहे यासाठी या परीक्षेत यावे, असे आवाहन त्यांनी केले.माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात आमदार अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले. मेहनतीशिवाय पर्याय नाही. मी पण स्पर्धा परीक्षा दिली होती. माझेही स्वप्न लाल दिव्याच्या गाडीचे आहे, असे सांगून गौरव साळुंके यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शामराव पाटील, डॉ. वाय. आर. सुर्यवंशी, गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, जि. प. सदस्य संगीता भिल, लोण येथील माजी सरपंच अंकिता पाटील, माजी सरपंच नारायण कोळी, माजी सरपंच डॉ. अशोक पाटील, माजी सरपंच विनायक बडगुजर, रामदास जीवन कोळी, बाळासाहेब पवार, वसंत पाटील, नाना धनगर, जितेंद्र पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामपंचायत सदस्य, वि. का. सोसायटी चेअरमन, मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन किरण बडगुजर  व गंगासागर वानखेडे  यांनी केले.