लोकमत न्यूज नेटवर्कहरताळे, ता.मुक्ताईनगर : यंदाही परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने निराशा हाती आली आहे. खरीप बुडाला तरी रब्बीची आशा होती. परंतु, रब्बी पिकासाठी आवश्यक असणारा परतीचा पाऊस झाला नाही. त्यात हरताळे परिसरात सिंचनाचीही सोय उपलब्ध नसल्यामुळे आता खरिपाबरोबर रब्बीचीही आशा मावळली आहे.बहुतांश पिके पावसावर अवलंबून होते. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कापूस, ज्वारी, मका कडधान्य आदी पिकांची पेरणी केली होती. सुरवातीला पावसाने चांगली हजेरी दिली. पाऊस दमदार नसला तरी हलक्या सरी जोरात होत्या. परंतु सर्वच पिके फुलोरा येण्याच्या वेळीच खरिपाची हानी झाली. दमदार पावसाअभावी शेतकºयांना पिकास वाचविणे शक्य झाले नाही.खरीपाच्या पिकाचे नुकसान झाले असले तरी शेतकरी रब्बी पिकावर अवलंबून असतात. त्यासाठी परतीच्या पावसाची प्रतिक्षाच राहिली. सप्टेंबर, आॅक्टोबर संपुर्ण कोरडा गेला. विहिरी, नदी, नाले कोरडे राहिले. विहिरी बोअरवेलची पाणी पातळी वाढली नाही. त्यामुळे रब्बीच्या गहू, हरभरा, मका या प्रमुख पिकांच्या लागवडीसाठी मुहूर्त शेतकºयांना अद्याप गाठता आला नाहीं .किंबहूना पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता ही पिके घ्यावीत की नाही असा प्रश्न उपस्थित झाला. दुसरीकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने शेकडो हेक्टर शेती रब्बी हंगामापासून वंचितच आहे कारण जमिनीत ओलावा नाही.
हरताळे परिसरात खरीप बुडाला, रब्बीची आशा मावळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 1:20 AM
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे परिसरात परतीच्या पावसाने दिलेला धोका आणि सिंचनाची सुविधा नसल्याने खरीप हंगाम बुडाला असून रब्बीचीही आशा मावळली आहे.
ठळक मुद्देसिंचनाची सुविधा करण्याची मागणीभारनियमनाचे भूतही शेतकºयांच्या मानगुटीवर