जामनेर : खावटी योजने अंतर्गत त्यांची लाभार्थ्यांना वाटप होऊन रोख रक्कमही दिली जाते. राज्य शासनाने खावटी अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या
खात्यातच जमा करावी, अशी मागणी जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे.
कजगावात डेंग्यू रुग्णांची
संख्या वाढल्याने चिंता
कजगाव, ता. भडगाव : कजगावात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने गावात फवारणी
केली जात आहे तर आरोग्य खात्याकडून डबके, पाण्याच्या उघड्या टाक्या यात औषध टाकली जात आहे.
जामनेरला शिवसंपर्क
अभियान सुरू
जामनेर : तालुक्यातील वाकडी, शेंगोळे, हिवरखेडा तवा, चिंचखेडा तवा या गावात शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. शिवसेना सदस्य नोंदणी, शाखा विस्तार याबाबत माहिती देण्यात आली.