हिंगोणा, ता़ यावल : मारूळ येथे पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून रविवारी सकाळी तीन बालकांना कुत्र्यांनी चावा घेतला आह़े
नीलेश दीपक भालेराव (11), तेजेश्री प्रवीण हटकर (4) व सैय्यद आसमाबानो मुदबीर अली (13) या तीन लहान बालकांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी तोंडाला, मानेला, हाताला, पायाला व कंबरेला चावा घेऊन जखमी केले आह़े
रविवारी सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान तीनही बालके घरातील अंगणात खेळत असताना अचानक पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला़ तीनही बालकांवर न्हावी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आल़े ग्रामपंचायत सदस्य प्रवीण हटकर, बाळू तायडे, गंगाराम पाटील, नरेश तायडे यांनी जखमी बालकांना रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ़वासुदेव पाटील, कर्मचारी मोहिनी भारंबे, बापूराव लोखंडे यांनी उपचार केल़े तीनही बालकांना अधिक उपचारासाठी जळगाव हलवण्यात आले आह़े
150 कुत्रे आली कुठून?
ग्रामस्थांच्या माहितीनुसार कुठल्याही तरी गावातून शंभर ते दिडशे मोकाट कुत्री गावात सोडण्यात आली आहेत. त्यातील अनेक कुत्री पिसाळलेली असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आह़े पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत़ (वार्ताहर)