जळगाव : कर्नाटक राज्यातील बंगळुरु शहरातून अपहरण झालेला 12 वर्षाचा मुलगा जळगाव रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचा:यांच्या समयसूचकतेमुळे बचावला असून त्याला आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, मुलाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या आईने त्याला पाहताच मिठी मारली. मुलगा व आईच्या डोळ्यातून तरळणारे आनंदाश्रू पाहून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचेही डोळे पाणावले होते.टेलरकडे जात असताना अपहरणया घटनेची माहिती अशी की, श्रवण उर्फ अजरुन अनंतकुमार बयरप्पा (वय 12 रा.मागडी रोड, बंगळुरु, कर्नाटक) हा 5 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास जुने कपडे शिवण्यासाठी टेलरकडेजात असताना रस्त्यात तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन तरुणांनी त्याच्या तोंडाला रुमाल सुंगवून त्याचे अपहरण केले होते. त्यानंतर या तिघांनी त्याला कर्नाटक एक्सप्रेसमध्ये नेले. बेशुध्दावस्थेत त्याला रात्री शौचालयामध्येच बसविण्यात आले. त्याच्याजवळ एक जण थांबून होता. दिवसा मनमाड स्थानक आल्यावर अजरुन थोडा शुध्दीवर आला. तेथे रेल्वे सुरक्षा बलाकडून गाडीची नियमित तपासणी होत असल्याचे पाहून अपहरणकर्ते त्याच्यापासून लांब थांबले. पूर्णपणे शुध्दीवर नसल्याने अर्जुन शौचालयाच्या बाहेर गुंगीत असल्याने झोपलेलाच होता. जळगाव स्थानकावर तपासणीत आढळला अजरुनएक्सप्रेसपुढे रवाना झाल्यानंतर शनिवारी दुपारी साडे चार वाजता ही गाडी जळगाव स्थानकावर आली. तेथे रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक के.बी.सिंग व कुलथी हे नियमितपणे गाडीची तपासणी करीत असताना अजरुन हा झोपलेला होता. दोघांनी त्याला उठविले असता तो अर्धवट गुंगीतच होता. बोगीतील प्रवाशांकडे मुलाच्या बाबतीत चौकशी केली असता तो मनमाडपासूनच तेथे झोपलेला आहे व तेव्हापासून त्याच्यासोबत कोणीच नाही असे सांगण्यात आले. बेवारस समजून पोलिसांनी त्याला स्थानकावर उतरवून घेतले. नंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात आणण्यात आले. अपहरणकर्ते मात्र यावेळी जवळपासही फिरकले नाहीत. ते गाडीतच असावेत किंवा मनमाडला उतरले असावेत अशी शंका पोलिसांना होती.ओळख स्पष्ट झाल्यानंतर सोनोने यांनी त्याच्या कुटुंबाचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळविला व रात्री बारा वाजता त्याची आई पुष्पा हिच्याशी त्याचे बोलणे करुन दिले. मुलगा सापडल्याचे कळताच आई, वडील अनंतकुमार, मामा सुरेश भटप्पा व काका पुनीत कुमार हे तातडीने बंगळुरु येथून मुंबईत विमानाने आले व तेथून शनिवारी संध्याकाळी सहा वाजता रेल्वेने जळगावात दाखल झाले. मुलाला पाहताच आईने त्याला मिठी मारली. सर्वाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. दरम्यान, अजरुन हा सीबीएसई पॅटर्नचा विद्यार्थी असून सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. वडील कर्नाटक विधानभवनात टायपीस्ट म्हणून तर आई खासगी संस्थेत नोकरीला आहे. मोठी बहिणही शिक्षण घेते.जळगाव रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांमुळे माझा मुलगा मला परत मिळाला आहे. त्यांचे आभार मी शब्दात मानू शकत नाही. त्यांची तत्परता व समयसूचकता नक्कीच वाखाणण्यासारखी आहे.ं-पुष्पा बयरप्पा, अजरुनची आई
कर्नाटकातून अपहरण केलेल्या मुलाची सुटका
By admin | Published: January 08, 2017 12:45 AM