वृद्ध महिला आपल्या अल्पवयीन नातीला मुलीला भेटायला घेऊन जाण्यासाठी बसस्थानकावर आली असताना लघुशंकेला जाऊन येते, असे सांगून मुलगी गायब झाली. आजी व नातेवाइकांनी शोधण्याचा प्रयत्न केला. तिच्या मोबाइलवर संपर्क केला असता तिने आपला मोबाइल बंद करून ठेवला होता. काही सामाजिक कार्यकर्ते व नातेवाइकांनी अधिक तपास केला असता त्यांना ती मुलगी मोटारसायकलवर (क्र. एमएच १८ बीपी ९३०७) एका तरुणाबरोबर भागवत रोडने निघून गेल्याची माहिती मिळाली.
ही मोटारसायकल गोपीचंद बारकू पवार (डाबली धांदरणे, ता. शिंदखेडा) या तरुणाच्या ताब्यात होती आणि एक महिन्यापूर्वी याच मुलाने तरुणीला तिच्या आईच्या गावातूनच पळवून नेणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे गोपीचंद यानेच तिला आमिष दाखवून पळवून नेल्याची खात्री झाल्याने आजीच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गोपीचंद पवार यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.