शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

तीन जणांचे अपहरण करत व्यापाऱ्याकडे मागितली आठ लाखांची खंडणी

By विजय.सैतवाल | Published: June 04, 2024 12:06 AM

खळबळजनक : तिघांच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना

जळगाव : ऑनलाइन गेमिंग खेळण्यासाठी गेलेल्या तीन जणांचे अज्ञात सहा जणांनी कुसुंबा येथील साई सिटी येथून अपहरण करून परराज्यात नेले. त्यांच्या सुटकेसाठी सागर कमल लुल्ला (२४, रा. नवजीवन सोसायटी, भुसावळ) या व्यापाऱ्याकडे आठ लाख रुपयांची खंडणी मागितली असून यापैकी एक लाख ९० हजार रुपये व्यापाऱ्याने पाठविले आहे. अपह्रतांच्या शोधार्थ एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक छत्तीसगडकडे रवाना झाले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

व्यापारी सागर लुल्ला यांचा शेअर मार्केटिंगचा व्यवसाय असून जळगाव येथील सिंधी कॉलनी येथे त्यांचे दुकान आहे. ते दररोज भुसावळ येथून अपडाऊन करतात. त्यांच्या पत्नीचा आतेभाऊ रोहित कैलास दर्डा (रा. टीव्ही टॉवर, भुसावळ), मित्र विशाल अनिल शुबवाणी (रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) हे काही दिवसांपासून अजय ठाकरे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्यासोबत कुसुंबा   येथे ऑनलाइन गेमिंग खेळत आहे.  रविवार, २ जून रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास लुल्ला यांना त्यांच्या मोबाईलवर मित्र विशाल शुबवाणी यांच्या फोनवरून कॉल आला व त्यांनी सांगितले की, आम्ही फसलो आहे. आम्हाला घेण्यासाठी रात्री १ वाजता सहा इसम आले. त्यांना जर २५ लाख रुपये नाही दिले तर ते आम्हाला लखनऊ घेऊन जातील. तुम्ही २५ लाख रुपये द्या. त्यावेळी फिर्यादीने, त्यांच्याकडे एवढे पैसे नसल्याचे सांगत लगेच फोन कट केला.  मात्र पुन्हा त्यांच्या मोबाईलवर सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुसरा फोन आला. पलीकडून अज्ञात इसमाने सांगितले की, ‘तुमको अगर तुम्हारे आदमी चाहिये तो जल्दी से जल्दी पैसे दो, ’ असे म्हणून त्याने फोन विशाल शुबवाणी यांच्याकडे दिला. त्यांनी सांगितले की, आमचे या इसमांसह बोलणे झाले असून आठ लाख रुपयांमध्ये ठरले आहे. तू मला ८ लाख रुपये पाठवून दे. फिर्यादीने मात्र त्यांच्याकडे अडीच लाख रुपये असल्याचे सांगितले.

तिघांचा ओरडण्याचा आवाजसकाळी १० वाजता लुल्ला हे त्यांच्या दुकानावर गेले असता दुकानावर त्यांच्या ओळखीचे इसम आले व त्यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीत काम करणारा पवन याला मोबाईलवर अजय ठाकरे यांचा कॉल आला होता व कोणीतरी दुसऱ्या इसमाने सांगितले की, यांना लवकर पैसे द्या. नाहीतर आम्ही रोहित दर्डा, विशाल शुबवाणी, अजय ठाकरे यांना मारून टाकू. त्यावेळी फोनच्या बाजूला अजय, रोहित आणि विशाल यांचे मोठमोठ्याने ओरडण्याचे आवाज येत होते. नंतर परत संध्याकाळी पवन याला फोन आला धमकावत अज्ञात व्यक्तीने अजय ठाकरे यांचा बँक खाते क्रमांक पाठविला व लुल्ला यांनी त्यावर एक लाख २० हजार रुपये पाठविले. दुसरीकडे पैसे मागणीबाबत रोहित दर्डा यांची बहीण पूजा दर्डा यांनीदेखील सांगितले की, रोहितला कोणीतरी किडनॅप केले आहे. त्याला सोडवण्यासाठी समोरच्या व्यक्तींनी पैशाची मागणी केल्याने ७० हजार रुपये पाठवले आहे.

या प्रकरणी सागर लुल्ला यांनी एमआयडीसी पोलिस फिर्याद दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांचे पथके छत्तीसगडच्या दिशेने रवाना झाली आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव