शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

साकेगावमधील चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणाचा पर्दाफाश, पाच जणांना अटक, एका पोलिसाचाही समावेश 

By विजय.सैतवाल | Published: April 30, 2024 12:23 AM

पोलिसांच्या पाठलागाची कुणकुण लागताच आठ महिन्यांचा चिमुकला ठेवला अनाथाश्रमात

 जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथून झोक्यातून पळवून नेलेल्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याचा पोलिसांनी शोध लावला असून या बालकाला भुसावळातील अलका जीवन स्पर्श फाउंडेशन ट्रस्ट या अनाथाश्रमातून ताब्यात घेत पालकांच्या स्वाधीन केले. दोन अल्पवयीन मुले व एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मदतीने बालकाला मुबंई येथे विकण्यात आल्याची बाब समोर आली आहे. मात्र पोलिस मागावर असल्याची कुणकुण लागताच या बालकाला अनाथाश्रमात आणून ठेवण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवार, २९ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत दिली.  

साकेगाव येथून एका घरातून मंगळवार, २३ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास झोक्यात झोपलेल्या आठ महिन्यांच्या बाळ‌ाचे अपहरण करण्यात आले होते. या याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ तालुका पोलिस तपास करत असताना या दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भुसावळ शहरातील नारायण नगरातील अलका जीवन स्पर्श फाउंडेशन या ट्रस्टवर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे अपहरण झालेले आठ महिन्याचे बालक सापडले. त्याला ताब्यात घेत ते पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

दोन अल्पवयीन मुलांचा समावेशया गुन्ह्यात पोलिसांनी दीपक रमेश परदेशी (३२, रा. नारायण नगर, भुसावळ), अमीत नारायण परिहार (३०, रा. नागसेन कॉलनी, कंडारी, ता. भुसावळ), कुणाल बाळू वाघ (१९, रा. साकेगाव, ता. भुसावळ), बाळू पांडूरंग इंगळे (५१, रा. वरणगाव, ता. भुसावळ), रिना राजेंद्र कदम (४८, रा. नारायण नगर, भुसावळ) या पाच जणांना अटक करण्यात आले आहे. या शिवाय  अजून एका जणाचा शोध सुरू असून दोन अल्पवयीन मुलांचाही यात समावेश असल्याचे समोर आले आहे. या अल्पवयीन मुलांच्या मदतीनेच बालकाला झोक्यातून काढण्यात आले होते.

पोलिसाचाही समावेशअटकेतील बाळू इंगळे हा नंदुरबार जिल्हा पोलिस दलात बिनतारी संदेश विभागात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत आहे. तसेच अटक केलेल्या अन्य जणांवर खून, खंडणी, घरफोडी, जबरी चोरी, मारामारी, आर्म ॲक्ट व इतर प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तीन लाख ८० हजारात झाला व्यवहारया चिमुकल्याचे अपहरण प्रकरणात मुख्य सूत्रधार रिना कदम ही महिला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई येथील एका महिलेला मुल दत्तक घ्यायचे असल्याने त्याविषयी तिने रिना हिना सांगितले होते. त्यासाठी रिनाने दोन अल्पवयीन मुले व इतरांच्या मदतीने साकेगावातून आठ महिन्यांचे बाळ पळविले. त्यानंतर नंदुरबार पोलिस दलातील बाळू इंगळे याच्या मदतीने त्याला मुंबई येथे संबंधित महिलेला देण्यासाठी नेण्यात आले. यात तीन लाख ८० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. मात्र पोलिस पाठलाग करत असल्याची कुणकुण लागताच अपहरणकर्त्यांनी बालकाला अनाथाश्रमात आणून ठेवले. मात्र सीसीटीव्ही फुटेज व अन्य तांत्रिक मुद्द्यांवरून ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

दरम्यान, सदर अनाथाश्रमाची धर्मादाय आयुक्तांकडे २०२२मध्ये नोंदणी झालेली आहे. मात्र हा अनुभव पाहता या विषयी धर्मादाय आयुक्तांना या प्रकरणाविषयी महिती देण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

यांनी केली कारवाईपोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, पोलिस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल पाटील, सहाय्यक फौजदार विठ्ठल फुसे, पोहेकॉ युनूस शेख, प्रेमचंद सपकाळे, वाल्मिक सोनवणे, दिलीप जाधव, संजय भोई, संजय तायडे, पोलिस नाईक नितीन चौधरी, जगदीश भोई, राहुल महाजन, सहाय्यक फौजदार सादीक शेख, पोहेकॉ उमाकांत पाटील, रमन सुरळकर, योगेश माळी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर आढाळे, राहुल भोई, पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांनी कारवाई केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस